चेन्नईच्या चाहत्यांना मोठा धक्का! स्टार खेळाडूची आयपीएलमधून निवृत्ती

Ambati Rayudu Retirement : रायडूने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे चेन्नई संघाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
चेन्नईच्या चाहत्यांना मोठा धक्का! स्टार खेळाडूची आयपीएलमधून निवृत्ती
Ambati Rayudu RetirementSaam TV

Ambati Rayudu Retirement : आपल्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाला अनेक सामने जिंकून देणाऱ्या अंबाती रायडूने (Ambati Rayudu) अखेर आयपीएलला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेनंतर रायडू आयपीएलमधून निवृत्ती घेणार आहे. रायडूने स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. रायडूने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे चेन्नई संघाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 4 वेळा चॅंम्पियनपद पटकाविणाऱ्या चेन्नई संघाने यंदाच्या आयपीएल हंगामात निराशाजनक कामगिरी केली. स्पर्धेत 8 सामने गमवल्यानंतर चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. (Ambati Rayudu Retirement IPL 2022)

Ambati Rayudu Retirement
IPL: चेन्नईचे भविष्य उज्वल, सेहवागने सांगितला MS Dhoni चा उत्तराधिकारी

आयपीएल 2022 मध्ये रायुडूला फारशी चमक दाखवता आली नाही. कदाचित त्यामुळेच या ३६ वर्षीय फलंदाजाने आता आयपीएललाही अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. रायडूने IPL 2022 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये 27.10 च्या सरासरीने 271 धावा केल्या आहेत. यामध्ये फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या अंबाती रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली होती. सध्या रायडू फक्त आयपीएल खेळत होता.

रायुडूने 2013 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून वनडे पदार्पण केले होते. त्याने 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1694 धावा केल्या. यामध्ये 3 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 2019 मध्ये, जेव्हा अंबाती रायडूला विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही, तेव्हा त्याच्या जागी आणखी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला, त्यानंतर त्याने अचानक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तेव्हा तो चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा प्रबळ दावेदार होता. संघाची निवड न झाल्याचा फटका संघाला सहन करावा लागला आणि न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पराभवाचे हेही एक कारण होते.

दरम्यान, आपण आयपीएल 2022 नंतर निवृत्ती घेणार असल्याचं ट्विट रायडूने केलं होतं. त्यानंतर काही तासांतच त्याने हे ट्विट डिलीट केलं आहे. त्यामुळे रायडूच्या मनात चाललंय तरी काय असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.

काय म्हटले होते ट्विटमध्ये?

"मी जाहीर करत आहे की ही माझी अखेरची आयपीएल असेल. गेली 13 वर्ष मी आयपीएलमध्ये खेळत आहेत. 2 महान संघासोबत खेळण्याचा आनंद काही वेगळाच होता. अप्रतिम प्रवासासाठी मुंबई इंडियन्स आणि सीएसके यांचे मनापासून आभार मानायला आवडेल". अशी भावना रायुडूने ट्विटमध्ये व्यक्त केली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.