अनिकेत जाधवची भारतीय संघात निवड; फुटबॉल पंढरीत जल्लाेष

अनिकेत जाधवची भारतीय संघात निवड; फुटबॉल पंढरीत जल्लाेष
aniket jadhav

काेल्हापूर : उझबेकीस्तान येथे हाेणा-या अशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेत काेल्हापूरचा आंतरराष्ट्रीय फुटबाॅलपटू हा भारतीय संघात आपले काैशल्य सिद्ध करणार आहे. अशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी लढती हाेणार आहेत. त्यासाठी नुकताच भारतीय संघ जाहीर करण्यात आला. या संघात अनिकेत जाधवचा समावेश करण्यात आला आहे. aniket-jadhav-in-indian-football-team-afc-football-uzbekistan-kolhapur-trending-news-sml80

aniket jadhav
कबड्डीपटूची हत्या; सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण : उदयनराजे

काेल्हापूरातील स्थानिक स्पर्धांसह राज्य, राष्ट्रीय स्तरावर अनिकेतने कामगिरी सिद्ध करुन दाखवली आहे. युवा विश्वकरंडक फुटबाॅल स्पर्धेत त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले हाेते. इंडियन सॉकर लिग स्पर्धेत अनिकेत यंदा हैद्राबाद एफसी संघातून खेळणार आहे. उझबेकीस्तान येथे हाेणा-या अशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी २८ खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे.

उझबेकीस्तानच्या स्पर्धेत भारतीय संघास यजमान युएई यांच्यासह ओमान, किरगीज रिपब्लिक यांच्याशी सामने खेळावे लागतील. दरम्यान अनिकेतच्या निवडीने काेल्हापूरातील फुटबाॅलसह क्रीडाप्रेमींत चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

No stories found.