Copa America Final: विजयानंतर मेस्सीला कोसळले रडू; पाहा VIDEO

1993 नंतर प्रथमच अर्जेंटीनाने कोपा अमेरिका कप जिंकला आणि लिओनेल मेस्सीने आपल्या राष्ट्रीय संघासाठी पहिल्यांदाच सिनियर किताब जिंकला आहे.
Copa America Final: विजयानंतर मेस्सीला कोसळले रडू; पाहा VIDEO
Copa America Final: विजयानंतर मेस्सीला कोसळले रडूTwitter/ @CopaAmerica

ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यात शनिवारी कोपा अमेरिका फायनल रिओ दि जानेरो मधील ऐतिहासिक मराकाना स्टेडियमवर खेळविण्यात आली.

डि मारियाच्या गोलच्या मदतीने अर्जेटिनाने हा ऐतिहासिक सामना जिंकला. त्याचबरोबर हा सामना लिओनेल मेस्सीसाठी अधिक संस्मरणीय ठरला आहे. कारण 1993 नंतर प्रथमच अर्जेंटीनाने कोपा अमेरिका कप जिंकला आणि लिओनेल मेस्सीने आपल्या राष्ट्रीय संघासाठी पहिल्यांदाच सिनियर किताब जिंकला आहे.

दरम्यान, सामना संपल्यानंतर लगिच मेस्सी रडताना कॅमेरामध्ये कैद झाला आहे. इतक्या वर्षानंतर त्याने राष्ट्रीय संघासाठी पहिला वरिष्ठ किताब जिंकला आहे. हा किताब जिंकल्यानंतर अर्जेंन्टिनाच्या खेळाडूंनी जोरदार डान्स करुण आनंद व्यक्त केला आहे.

ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच वेळी सामना संपल्यानंतर नेमार आणि मेसी एकमेकांना मिठी मारताना दिसले.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com