Arjun Tendulkar Costly Over: एका ओव्हरमुळं अर्जुनच्या कारकिर्दीला गालबोट! तिसऱ्याच सामन्यात लाजिरवाणा विक्रम

Arjun Tendulkar Costly Over: आपला तिसराच सामना खेळत असलेल्या अर्जुन तेंडुलकरच्या नावे एका नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
arjun tendulkar
arjun tendulkar

MI VS PBKS IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत शनिवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला १३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान आपला तिसराच सामना खेळत असलेल्या अर्जुन तेंडुलकरच्या नावे एका नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.

arjun tendulkar
IPL 2023 : IPL सुरू असतानाच विराट, रोहित अन् धोनीला मोठा धक्का, असं घडलं तरी काय?

अर्जुनच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद...

गेली २ वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर अर्जुन तेंडुलकरला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या सामन्यात त्याला विकेट मिळाली नव्हती. दुसऱ्या सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी करत १ विकेट मिळवला होता.

मात्र तिसऱ्या सामन्यात त्याने निराशाजनक कामगिरी केली आहे. या कामगिरीसह त्याच्या नावे एका नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे. अर्जुनने या डावात गोलंदाजी करताना तब्बल ३१ धावा खर्च केल्या. (Arjun Tendulkar)

यासह त्याने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्याने या यादीत सहावे स्थान मिळवले आहे. या सामन्यात त्याने ३ षटकांमध्ये ४८ धावा खर्च करत एक विकेट मिळवली. (Latest sports updates)

arjun tendulkar
Arshdeep Singh Wickets Video: नाद करा पण अर्शदीपचा कुठं! सलग २ चेडूंवर स्टंपचे केले २ तुकडे पाहा VIDEO

एकाच षटकात सर्वाधिक धावा खर्च करणारे गोलंदाज..

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हर्षल पटेल अव्वल स्थानी आहे. हर्षल पटेलने ३७ धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर प्रशांत परमेश्वरनने देखील ३७ धावा खर्च केल्या होत्या.

तर तिसऱ्या स्थानी असलेल्या डॅनियल सॅम्सने ३५ धावा खर्च केल्या होत्या. तर परविंदर अवानाने ३३, रवी बोपाराने ३३ धावा खर्च केल्या होत्या. आता या यादीत अर्जुन तेंडुलकरची भर पडली आहे. अर्जुनने ३१ धावा खर्च केल्या आहेत.

अर्जुन तेंडुलकर या डावात १६ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. याच षटकात त्याने ३१ धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर सॅम करनने षटकार मारला. दुसरा चेंडू वाईड तर तिसऱ्या चेंडूवर सॅम करनने चौकार मारला.

पुढच्या चेंडूवर त्याने एक धाव घेत स्ट्राईक हरप्रीतला दिली. या चेंडूवर हरप्रीतने चौकार मारला. सहाव्या चेंडूवर त्याने षटकार मारला. पुढचा चेंडू अर्जुनने नो बॉल टाकला. या चेंडूवरही त्याने चौकार मारला. शेवटच्या चेंडूवरही त्याने चौकार मारला यासह त्याने ८ चेंडूंमध्ये ३१ धावा खर्च केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com