Arjun Tendulkar viral video: अर्जुन तेंडुलकरचा तो व्हायरल व्हिडिओ फेक! येथे पाहा ओरिजनल व्हिडिओ

Arjun Tendulkar video: अर्जुन तेंडुलकरचा एक बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत झाला होता. त्यामुळे त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
Arjun Tendulkar viral video
Arjun Tendulkar viral videoMumbai Indians Twitter

Arjun Tendulkar Fake video: मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात मंगळवारी 26 एप्रिल रोजी सामना झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2023 च्या 35 व्या सामन्यात आमनेसामने होते. या सामन्यात गतविजेत्या गुजरातने मुंबईचा ५५ धावांच्या फरकाने पराभव केला. दरम्यान या सामन्यानंतर अर्जुन तेंडुलकरचा एक बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत झाला होता. त्यामुळे त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. गुजरातविरुद्ध सामन्यानंतर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात तो मैदानावर असताना नाकात बोट तेच तोंडात घालताना दिसत होता. हे किळसवाण कृत्य पाहून लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले होते.

Arjun Tendulkar viral video
IPL 2023: ऑरेंज कॅपची लढत आणखी रोमांचक, पर्पल कॅप या गोलंदाजाच्या डोक्यावर

परंतु तो व्हिडिओ फेक आणि बनावट असल्याचे समोर आले आहे. ओरिजनल व्हिडिओ रिव्हर्स करून व्हायरल करण्यात आला होता असे समोर आले आहे. ओरिजनल व्हिडिओमध्ये त्याने आधी बोडाचे नख चावले आणि त्यानंतर ते नाकात टाकल्याचे दिसत आहे. हा ओरिजन व्हिडिओ आता समोर आला आहे. (IPL 2023)

येथे पाहा ओरिजनल व्हिडिओ...

Arjun Tendulkar viral video
PBKS VS LSG Match Result: लखनऊचे 'नवाब' पडले पंजाबच्या 'वाघांवर' भारी! पराभवाचा बदला घेत मिळवला ५६ धावांनी विजय

अर्जुन तेंडुलकर सध्या मुंबई इंडियन्सकडून खेळत आहेत. यंदा त्याने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात अर्जुनने टाकलेल्या शेवटच्या षटकामुळे त्याची प्रचंड प्रशंसा झाली. या सामन्यात मुंबईने शेवटच्या षटकात विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मासह क्रिकेटमध्ये दिग्गजांकडून अर्जुनवर कौतुकाचा वर्षाव झाला. परंतु त्यानंतर पुढच्यास सामन्यात त्याचा बनावट व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. (Latest Sports News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com