अ‍ॅश्ले बार्टी ठरली विम्बलडनची नवी राणी

पाच वर्षात महिला एकेरीमध्ये विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी अ‍ॅश्ले बार्टी ही पहिलीच ऑस्ट्रलियन खेळाडू ठरली आहे.
अ‍ॅश्ले बार्टी ठरली विम्बलडनची नवी राणी
अ‍ॅश्ले बार्टी ठरली विम्बलडनची नवी राणीTwitter/ @ashbarty

नशिबाशिवाय कोणालाही काही मिळत नाही. एक प्रोफेशन सोडून दुसरे प्रोफेशन अवलंबणे ही आजच्या माणसांची सवय बनली आहे. पण जे काही नशिबात लिहिलेले आहे ते कायम आहे. असेच काहीसे ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू अ‍ॅश्ले बार्टीच्या (Ashleigh Barty) बाबतीत घडले. जी लहानपणापासूनच टेनिस खेळत होती. परंतु टेनिसच्या खेळापासून विश्रांती घेतल्यानंतर, तिने क्रिकेटपटू होण्याचा विचार केला. परंतु, यश मिळू शकले नाही, नंतर पुन्हा रॅकेट घेतला आणि मग आता टेनिसमध्ये इतिहास रचला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या अ‍ॅश्लेह बार्टीने झेक प्रजासत्ताकच्या आठव्या मानांकित करोलिना प्लिस्कोव्हाचा तीन सेटमध्ये 6-3, 6-7, 6-3 ने पराभव करून विम्बल्डनचे (Wimbledon 2021) अजिंक्यपद पटकावले. पाच वर्षात महिला एकेरीमध्ये विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी अश्ले ही पहिलीच ऑस्ट्रलियन खेळाडू ठरली आहे. या अगोदर इवोन गूलागोंग कावलेने (1980) विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. 2019 च्या प्रेंच ओपन नंतर अश्लेचा हा दुसरा ग्रँड स्लाम किताब आहे.

अ‍ॅश्ले बार्टी ठरली विम्बलडनची नवी राणी
हरभजन सिंग आणि पत्नी गीताने दिले दुसऱ्यांदा Good News

पहिल्या तीन सेटमध्ये अंतिम सामना जिंकण्यासाठी बार्टीला 1 तास 55 मिनिटे संघर्ष करावा लागला. त्याचबरोबर ग्रँड स्लॅम फायनलमध्ये कॅरोलिनाचा हा दुसरा पराभव आहे. तिचा मागील पराभव 2016 च्या यूएस ओपनच्या अंतिम सामन्यादरम्यान झाला होता. जेव्हा तिला जर्मनीच्या अँजेलिक केर्बरकडून तीन सेटमध्ये पराभव पत्करावा लागला होता. अशा प्रकारे, पुन्हा एकदा कॅरोलिनाचे विजेतेपदाचे जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com