Australian Open 2022: ऍशले बार्टी चॅम्पियन, तिसरे ग्रँड स्लॅम जिंकून रचला इतिहास

ख्रिस ओ'नीलने त्याच्या आधी 1978 मध्ये शेवटचे हे विजेतेपद पटकावले होते.
Australian Open 2022: ऍशले बार्टी चॅम्पियन, तिसरे ग्रँड स्लॅम जिंकून रचला इतिहास
Ashleigh BartySaam TV

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ऍशले बार्टीने (Ashleigh Barty) ऑस्ट्रेलियन ओपन 2022 (Australian Open 2022) च्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. ऍशले बार्टीने अंतिम फेरीत अमेरिकेच्या डॅनियल कॉलिन्सचा सरळ सेटमध्ये पराभव करून तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. शनिवारी 29 जानेवारी रोजी रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या या अंतिम फेरीत बार्टीने कॉलिन्सचा 6-3, 7-6 असा पराभव करून पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. यासोबतच त्यांनी इतिहासही रचला. 44 वर्षात महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन महिला आहे.

Ashleigh Barty
Ranji Trophy 2022: रणजी ट्राफीची तारीख ठरली; पण ठिकाणाबाबत संभ्रम

ख्रिस ओ'नीलने त्याच्या आधी 1978 मध्ये शेवटचे हे विजेतेपद पटकावले होते. ही फायनल दोन्ही खेळाडूंसाठी खास होती, कारण दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. बार्टीची ही केवळ तिसरी अंतिम फेरी होती, तर कॉलिन्स पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. खरेतर, कॉलिन्सने प्रथमच ग्रँड स्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे आगेकूच केली होती. मात्र, तिच्या या चमकदार प्रवासाचे अंतिम फेरीत विजेतेपदात रुपांतर झाले नाही कारण ऑस्ट्रेलियाची स्टार बार्टीसमोर विजेतेपदाचे स्वप्न अधुरेच राहिले.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com