Asia Cup 2023: बाबरने मोडला विराटचा रेकॉर्ड, पाकिस्तानात आनंदाची लाट, पण पुढच्याच चेंडूवर दांड्या गुल, पाहा VIDEO

Asia Cup 2023 Latest Updates: बाबरने विराटचा रेकॉर्ड मोडताच पाकिस्तानातील मैदानावर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, त्यांचा हा जल्लोष फार काळ टिकू शकला नाही.
Asia Cup 2023 Babar Azam Breaks Virat Kohli Record but Next Ball bold Taskin Ahmed
Asia Cup 2023 Babar Azam Breaks Virat Kohli Record but Next Ball bold Taskin AhmedSaam TV

Babar Azam's Wicket Video [Watch]:

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. आशिया चषक स्पर्धेत बाबरच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत असून त्याच्या नावावर मोठमोठ्या विक्रमांची नोंद होत आहे. बुधवारी आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर-४ मध्ये पाकिस्तानचा बांग्लादेशसोबत झाला. या सामन्यात बाबर आझमने विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला. (Latest Marathi News)

Asia Cup 2023 Babar Azam Breaks Virat Kohli Record but Next Ball bold Taskin Ahmed
IND vs PAK, Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला मोठा धक्का; मॅचविनर गोलंदाज आशिया कपमधून बाहेर?

दरम्यान, बाबरने विराटचा रेकॉर्ड मोडताच पाकिस्तानातील मैदानावर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, त्यांचा हा जल्लोष फार काळ टिकू शकला नाही. पुढच्याच चेंडूवर असं काही घडलं, की संपूर्ण मैदानावर सन्नाटा पसरला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

आशिया चषक २०२३ (Asia Cup 2023) स्पर्धेतील सुपर-४ सामन्याला बुधवारपासून सुरुवात झाली. यातील पहिला सामना पाकिस्तान आणि बांग्लादेश या दोन संघादरम्यान झाला. प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशचा १९३ धावांवर गारद झाला. त्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांनी संयमी खेळी करत ३ गड्यांच्या मोबदल्या पूर्ण केलं.

बाबर आझमने चौकार ठोकत पाकिस्तानला दमदार सुरुवात करून दिली. यादरम्यान, वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात कमी डावांमध्ये २००० धावा करण्याचा विक्रम बाबरने नावावर केला. त्याने विराट कोहली (३६ डाव) याचा विक्रम मोडला. बाबरने विराटचा विक्रम मोडताच मैदानावर पाकिस्तानी चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

मात्र, त्यांचा हा जल्लोष फार काळ टिकला नाही. तस्कीन अहमदने पुढच्याच चेंडूवर बाबर आझमची दांडी उडवली. बाबरची विकेट पडताच पाकिस्तानच्या मैदानावर भयान शांतता पसरली. बाबर आझम केवळ १७ धावा काढून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या इमाम उल हकने ७८ तर रिझवानने नाबाद ६३ धावांची अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com