
Asia Cup: आशिया चषक २०२३ स्पर्धा केव्हा होणार हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरतोय. आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे देण्यात आले आहे. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डचं म्हणणं आहे की, आशिया चषक २०२३ स्पर्धा ही हायब्रीड मॉडेलमध्ये झाली पाहिजे. म्हणजे इतर संघांविरुद्धचे सामने पाकिस्तानात आणि भारत - पाकिस्तानचा सामना दुसऱ्या ठिकाणी खेळवला जाईल.
मात्र बीसीसीआयने या गोष्टीसाठी साफ नकार कळवला आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डला श्रीलंका आणि बांगलादेशचे समर्थन मिळाल्याची माहिती समोर येत आहे.'
पाकिस्तानातील माध्यमातील वृतानुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डने पाकिस्तानच्या हायब्रीड मॉडेलमध्ये खेळण्याच्या प्रस्तावाला हिरवं कंदील दाखवलं आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्ड हायब्रीड मॉडेलमध्ये खेळण्यास तयार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेअरमन नजम सेठी यांनी एशियन क्रिकेट काऊंसिलकडे प्रस्ताव पाठवला आहे. जय शाह हे एशियन क्रिकेट काऊंसिलचे अध्यक्ष आहेत. येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या इनसाईड स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार, 'मी अजुनपर्यंत प्रस्ताव पहिला नाहीये. ही स्पर्धा यूएईत आयोजित केली तर अति उष्णतेमुळे खेळाडूंना त्रास होऊ शकतो. तसेच खेळाडूंना दुखापत देखील होऊ शकते. श्रीलंकेत या स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते. आतापर्यंत आम्ही या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याबाबत काहीच चर्चा केली नाहीये. आम्ही आधी स्तिथी समजून घेऊ त्यानंतर निर्णय घेऊ.' (Latest sports updates)
तसेच ते पुढे म्हणाले की, 'हे पाहा, पुढे जाण्यासाठी सर्व ५ देशाना एकत्र यावं लागणार आहे. आम्हाला असं वाटतं की, ही स्पर्धा बाहेर कुठेतरी आयोजित केली गेली पाहिजे. पाकिस्तानात राजनैतिक तणाव सुरु आहे . ही स्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतला गेला पाहिजे.' बीसीसीआयने हायब्रीड मॉडेलमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डने या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा ईशारा देत त्रिकोणीय मालिका खेळण्याची धमकी दिली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.