
आज आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघाचा सामना झाला. सुपर-४ च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला १९४ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या इमाम उल-हक आणि मोहम्मद रिझवानने जोरदार फटकेबाजी करत बांगलादेश संघावर मात केली. (Latest Marathi News)
बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या फलंदाजांनी सयंमाने सुरुवात केली. पहिल्या षटकात त्यांनी ८ धावा कुटल्या. पाकिस्तानला दहाव्या षटका पहिला धक्का बसला. फखर जमानला शोरिफुलने पायचित केलं. जमानने ३१ चेंडूत ३ चौकार मारत २० धावा कुटल्या.
पाकिस्तानला १६ व्या षटकात पाकिस्तानला मोठा धक्का बसला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला तस्कीन अहमदने बाद केले. बाबर हा १६ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याने २२ चेंडूत १७ धावा कुटल्या.
इमाम-उल-हकने दमदार खेळी दाखवत ६० चेंडूत ५५ धावा करत अर्धशतक पूर्ण केलं. इमाम-उल-हकने एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील १९ वं अर्धशतक ठोकलं. त्यावेळी मोहम्मद रिझवान आणि इमाम-उल-हकने २० चेंडूत ४० भागिदारी रचली होती.
३३ व्या षटकात मिराजने इमामचा त्रिफळा उडवला. इमामच्या रुपाने पाकिस्तान तिसरा धक्का बसला. इमाम आणि मोहम्मद रिझवानने ८५ धावांची भागिदारी रचली होती. रिझवान ६३ धावांवर नाबाद राहिला होता. पाकिस्तानने ३९.३ षटकात ३ बाद १९४ करत मोठा विजय मिळवला.
टीम बांगलादेशने पाकिस्तानला १९४ धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेश संघाने ३८.४ षटकात १९३ धावा कुटल्या होत्या. पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रउफने बांगलादेश संघाला चांगलंच जेरीस आणलं. रउफने ६ षटकात १९ धावा देऊन ४ विकेट घेतले. बांगलादेशकडून मुश्फिकुर रहीमने ८७ चेंडूत ६४ धावा कुटत सर्वाधिक धावा केल्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.