
Asia Cup 2023 Latest Update: आशिया कप स्पर्धेला मिनी वर्ल्डकप असे देखील म्हटले जाते. मात्र २०२३ चा आशिया कप केव्हा होणार? या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीये. ठरल्याप्रमाणे आशिया कप २०२३ चे आयोजन पाकिस्तानात केले जाणार होते.
मात्र बीसीसीआयने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास सक्त नकार दिला आहे. त्यामुळे ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाणार असल्याची चर्चा सुरू होती. आता या स्पर्धेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.
भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन आशिया कप खेळण्यास नकार दिला. तर पाकिस्तानात सध्या हिंसाचार सुरू आहे. ही परिस्थिती पाहता स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये केल्याशिवाय पर्याय उरत नाही.
क्रीकबझजच्या वृत्तानुसार, आशिया कपचे आयोजन युएईत केल्यास श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन्ही संघ स्पर्धेतून माघार घेऊ शकतात.
ठरल्याप्रमाणे या स्पर्धेचे आयोजन सप्टेंबर महिन्यात केले जाणार आहे. या महिन्यात युएईतील वातावरण गरम असतं. ही स्थिती पाहता बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डने युएईत जाऊन स्पर्धा खेळण्याला लाल कंदील दाखवले आहे. त्यामुळे ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवली जाणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. (Latest sports updates)
मात्र पाकिस्तानला जर यजमानपद नाही मिळाले, तर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून माघार घेऊ शकतो. श्रीलंका आणि बांगलादेश वातावरण गरम असल्याने युएईत जाण्यास नकार देत आहे. याबाबत बोलताना पीसीबीने स्पष्ट म्हटले आहे की, ' यापूर्वी देखील युएईत स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. २०१८ मध्ये १५ ते २८ सप्टेंबर पर्यंत वनडे फॉरमॅटमध्ये स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. त्यावेळी यजमानपद बीसीसीआयकडे होते.'
तसेच त्यांनी पुढे म्हटले की,' २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान इथेच २०-२० फॉरमॅटमध्ये स्पर्धेचे आयोजन केले गेले होते.' पाकिस्तान क्रिकेट बोर्डचं म्हणणं स्पष्ट आहे की, स्पर्धा हायब्रीड मोडमध्ये व्हायला हवी. जर असं झालं नाही तर ते स्पर्धेतून माघार घेतील. भारत पाकीस्तान हे दोन्ही संघ वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत आमने सामने येणार असल्याची चर्चा सुरू आहे. हा सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.