Asia Cup 2023 IND vs PAK: भारत-पाकिस्तान सुपर-४ फेरीतील सामना रद्द होणार? समोर आलं मोठं कारण...

IND vs PAK Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान यांच्यातील सुपर-४ फेरीतला सामना ७० टक्के रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागे मोठं कारण समोर आलं आहे.
Asia Cup 2023 Super 4 IND vs PAK
Asia Cup 2023 Super 4 IND vs PAKSaam Tv

Asia Cup 2023 Super 4 IND vs PAK: आशिया कप २०२३ स्पर्धेतील थरार आता अंतिम टप्प्यात आला असून लवकरच सुपर ४ फेरीतील सामन्यांना सुरूवात होणार आहे. येत्या रविवारी (१० सप्टेंबर) भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. या सामन्याची क्रिडाप्रेमींना चांगलीच उत्सुकता लागली आहे. (Latest Marathi News)

अशातच भारत-पाकिस्तान यांच्यातील सुपर-४ फेरीतला सामना ७० टक्के रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागे मोठं कारण समोर आलं आहे. आशिया कप २०२३ च्या सुपर ४ फेरीतील संघ निश्चित झाले आहेत. या फेरीत भारत आणि पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेने अखेर आपले स्थान पक्के केले.

Asia Cup 2023 Super 4 IND vs PAK
ODI World Cup 2023 Team India : वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला संधी, कुणाचा पत्ता कट?

सुपर -४ चा पहिला सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. पाकिस्तान या सामन्याचे यजमानपद भूषवणार आहे. त्यानंतरचे सामने श्रीलंकेच्या कोलंबोत खेळवले जातील. या सामन्यातील सर्वात महत्त्वाचा सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना अनिर्णयीत घोषित करण्यात आला होता. यामुळे क्रिडाप्रेमींची चांगलीच निराशा झाली होती. आता येत्या रविवारी म्हणजेच १० सप्टेंबर रोजी खेळवल्या जाणाऱ्या सामन्याकडे क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, एकीकडे क्रिडाप्रेमी या सामन्याची वाट पाहत असताना दुसरीकडे एक चिंतानजक बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानचा सुपर-४ मधील सामना ७० टक्के रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Asia Cup 2023 Super 4 IND vs PAK
SL vs AFG Match: लंकेची अफगाणिस्तानवर मात! शेवटच्या टप्प्यात तोंडचा घास हिसकावला

कारण, पहिल्या सामन्याप्रमाणेच (Asia Cup 2023) या सामन्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोलंबोत सध्या पावसाचं वातावरण निर्माण झालं असून १० सप्टेंबर रोजी ७० टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सामन्यासाठी कुठलाही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

दरम्यान, सुपर ४ मधील भारताचा दुसरा सामना हा श्रीलंका या संघाबरोबर होणार आहे. हा सामना १२ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. तर तिसरा सामना हा बांग्लादेशविरुद्ध होणार असून या सामन्याची तारीख शुक्रवारी १५ सप्टेंबर ठेवण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com