Asia Cup Final : फायनलआधीच टीम इंडियाला धक्का; स्टार ऑलराउंडर जखमी, कुणाला मिळाली संधी?

Asia Cup 2023, Ind vs SL Final : गतविजेत्या श्रीलंकेसोबत 'फायनल' होणार असून, त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
Asia Cup Final, Team India
Asia Cup Final, Team IndiaSAAM TV

Washington Sundar to join Team India Sqaud :

आशिया कप २०२३ स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. आता गतविजेत्या श्रीलंकेसोबत 'फायनल' होणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

आशिया कपमध्ये मागील दोन सामन्यांत फलंदाजीला तळाला टीम इंडियाला सावरणारा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल जायबंदी झाला आहे. त्यामुळे आता टीम इंडियात मोठा बदल बघायला मिळणार आहे. (Latest sports updates)

अखेरच्या टप्प्यात आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियामध्ये पटेलच्या जागी अन्य एका ऑलराउंडरची एन्ट्री झाली आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, वॉशिंग्टन सुंदर कोलंबोला रवाना झाला आहे. अक्षर पटेलची जागा तो घेणार आहे.

वॉशिंग्टन सुंदर हा अलीकडेच आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियासोबत गेला होता. तीन सामन्यांच्या टी २० मालिकेतील दोन सामन्यांत त्याला संधी देण्यात आली होती. दोन्ही सामन्यांमध्ये एकही विकेट घेऊ शकला नव्हता. सुंदर हा आयपीएल २०२३ स्पर्धेत खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो बराच काळ संघाबाहेर होता.

Asia Cup Final, Team India
IND vs BAN, Asia Cup 2023: गिलची शतकी खेळी व्यर्थ! अटीतटीच्या लढतीत बांगलादेशी टायगर्स टीम इंडियावर पडले भारी

अक्षर पटेलला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यावेळी दुखापत झाली. दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र, अंतिम सामन्यात तो खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे.

अक्षर पटेलच्या जागी 'बॅकअप' म्हणून वॉशिंग्टन सुंदरला कोलंबोला बोलावण्यात आलं आहे. सुंदरचा समावेश भारतीय संघात करण्यात आला होता. मात्र, तो बेंगळुरूत होता. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अक्षरने ३४ चेंडूत ४२ धावांची खेळी केली होती. तर एक विकेट बाद केला होता. अक्षर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकाने फेकलेला थ्रो त्याच्या हातावर लागला होता.

प्लेइंग इलेव्हनमध्ये सुंदरला संधी मिळेल?

वॉशिंग्टन सुंदरला कोलंबोला बोलावण्यात आलं असलं तरी, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुंदर हा अष्टपैलू आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी दिली जाऊ शकते.

टीम इंडिया व्यवस्थापनाने तीन वेगवान गोलंदाजासह खेळण्याचा विचार केला तर, सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

Asia Cup Final, Team India
IND vs AUS Semi Final : भारताच्या हातातून सामना कसा निसटला; ही आहेत पराभवाची ५ मोठी कारणे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com