
IND vs SL Asia Cup Final:
भारत विरुद्ध श्रीलंकेदरम्यान आशिया कपचा अंतिम सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवला. या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने ७ षटकात सर्वाधिक जलक ६ गडी बाद करत तो 'मॅन ऑफ द मॅच'चा मानकरी ठरला आहे. तर कुलदीप यादवने 'मॅन ऑफ द 'सीरीज'चा मान पटकावला. टीम इंडियाच्या मोठ्या विजयानंतर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Latest Marathi News)
भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. सिराजने जबरदस्त गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. सिराजने एका षटकात ४ गडी बाद करत नवा इतिहास रचला. एकदिवसीय सामन्याच्या इतिहासात सिराजने सर्वाधिक जलद ५ गडी बाद करण्याचा विक्रम रचला आहे.
सिराजने श्रीलंकेचे १६ चेंडूत ५ गडी माघारी परतवले. या आधी चमिंडा वासने २००३ मध्ये बांगलादेशचे १६ चेंडूत ५ गडी बाद केले होते. मोहम्मद सिराज बेधड गोलंदाजीच्या जीवावर सामनावीर ठरला आहे. मोहम्मद सिराजला ५० हजार डॉलर मिळाले आहे. मोहम्मद सिराजने सामानावीर म्हणून मिळालेलं मानधान मैदानावरील कर्मचाऱ्यांना देण्याची घोषणा केली.
कुलदीप यादव या आशिया कप स्पर्धेत मालिकावीर ठरला आहे. कुलदीप यादवला पुन्हा एकदा फॉर्म गवसला आहे. कुलदीपच्या फिरकीच्या जाळ्यात फलंदाज अडकलेले पाहायला मिळाले. कुलदीपने ५ सामन्यात २८.३ षटक टाकत १०३ धावा दिल्या.
कुलदीपने या चषकात एकूण ९ गडी बाद केले. कुलदीपची या आशिया कपमध्ये मालिकावीराचा म्हणून घोषित करण्यात आले. कुलदीप हा मालिकावीर झाल्याने १५ हजार डॉलर (12,46,355 रुपये) मिळणार आहे. कुलदीपने त्याच्या यशाचं श्रेय कर्णधार रोहितला दिलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.