
आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेच्या (IND vs SL Asia Cup Final) संघात होणार आहे. हा सामना उद्या होणार आहे. सुपर-४ च्या अखेरच्या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानला २ गडी राखत पराभूत केलं आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. दरम्यान सुपर-४ च्या सामन्यात भारताविरुद्धच्या समान्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या फलंदाजांना खूप अडचणीत आणलं होतं. (Latest News on Sports)
उद्या आशिया चषकाचा अखेरचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची तर श्रीलंकेच्या संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी हाती आलीय. त्याचं कारण आहे, श्रीलंकेचा फिरकीपटू गोलंदाज आशिया चषकाच्या बाहेर गेलाय. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश तीक्षणा आशिया चषकाच्या बाहेर गेलाय. त्याच्या गुडघ्याला (हॅमस्ट्रिंग) दुखापत झालीय.
महेश तीक्षणा श्रीलंकेच्या संघात नसणं हे भारतीय संघासाठी आनंदाची गोष्ट आहे. मागील सामन्यात भारताविरुद्ध खेळताना त्याला एकच गडी बाद करता आला होता. परंतु तो भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्यात यशस्वी ठरत असतो. महेशला वगळल्यानंतर श्रीलंकेच्या व्यवस्थापनाने सहान अरिचागेला संघात संधी देण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान सहान अरिचागेनं श्रीलंकेकडून फक्त एकच सामना खेळलाय. त्यात त्याने एक गडी बाद केलाय.
त्याने आपले पदार्पण ७ जुलै २०२३ रोजी वेस्टइंडिजच्या विरुद्ध केलं होतं. या सामन्यात त्याने कायल मेयर्सला बाद केलं होतं. या सामन्यात तीक्षणाने ४ गडी बाद केले होते, त्यामुळे त्याला त्या सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच' घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे सहान भारताविरुद्धात कशी गोलंदाजी करेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, प्रसीध कृष्णा
श्रीलंकेचा संघ:
दासुन शनाका, पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, सदिरा समरविक्रमा, सहान अरिचागे, दुनिथा वेलेझ, मातिशा पथिरमान, दुनिथा वेलेझ, बी कतीशान राजिना, बी. फर्नांडो, प्रमोद मदुशन.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.