तिरंदाजीत भारताच्या ज्योतीस 'सुवर्ण'; कोरियाचा १ गुणाने पराभव

यंदाच्या चॅम्पियनशिपमधील भारताचे आणि ज्योतीचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
Jyothi Surekha Vennam
Jyothi Surekha Vennam

ढाका Asian Archery Championship : आशियाई तिरंदाजी स्पर्धेत महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नमाने (Jyothi Surekha Vennam) सुवर्णपदकावर माेहर उमटवली. वादग्रस्त झालेल्या अंतिम फेरीत ज्याेतीने दोनदा बलाढ्य कोरियनच्या ओह योह्यून या बलाढ्य खेळाडूवर मात केली. ओह योह्यून विरुद्ध एका गुणाने (१४६-१४५) विजय मिळवून देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणा-या ज्याेतीने उपांत्य फेरीत विश्वविजेत्या किम युन्हीचा १४८-१४३ असा एकतर्फी पराभव केला हाेता.

Jyothi Surekha Vennam
हाॅकीपटू अक्षता ढेकळे, वैष्णवी फाळकेची भारतीय संघात निवड

अंतिम फेरीतील अंतिम सेटमध्ये दोन गुणांनी आघाडी घेत जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या ज्योतीने एकदा १० गुण आणि दोनदा नऊ गुण मिळविले जे सुवर्णपदकासाठी दावेदार ठरले असते. परंतु कोरियनच्या खेळाडूने नऊ गुण मिळवूनही दहा गुणांचा दावा केल्याने काही काही गाेंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

प्रशिक्षकांसह संपूर्ण कोरियन तुकडीने आव्हान देत बाण १० वर असल्याचा दावा केला. पंचांनी भारताच्या बाजूने निकाल देत नऊ गुणांवर ठाम राहिले. बाण पूर्णपणे १० वरुन हुकला होता. सर्व कोरियन प्रशिक्षक टार्गेट (जेथे बाण मारताे ते ठिकाणी) पर्यंत गेले जे नियमानुसार नाही. हा पंचांवर दबाव आणण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न हाेता. जागतिक तिरंदाजीच्या नियमांनुसार, हा एका पंचाचा कॉल (निर्णय) आहे आणि त्यावर हरकत घेऊ शकत नाही असे भारतीय प्रशिक्षकांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com