Tokyo Olympics: वयाच्या 40 व्या वर्षी तेजस्विनी खेळणार ऑलिम्पिक

प्रशिक्षक कुहेली गांगुलीमुळे ती या पदापर्यंत पोहोचू शकली असल्याचे तेजस्विनीने सांगितले.
Tokyo Olympics: वयाच्या 40 व्या वर्षी तेजस्विनी खेळणार ऑलिम्पिक
नेमबाज तेजस्विनी सावंतSaam Tv

नेमबाज तेजस्विनी सावंत (Tejaswini Sawant) वयाच्या 40 व्या वर्षी प्रथमच ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2021) खेळणार आहे. यापूर्वी तिने 2010 च्या विश्वविजेतेपदामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तेजस्विनी सावंतचे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न दोन वेळा भंगले होते. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये आणि 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता तिचे स्वप्न टोकियो ऑलिम्पिकमध्ये पूर्ण होणार आहे. तिचा असा विश्वास आहे की वय फक्त एक नंबर आहे. पण तिच्या अनुभवाच्या माध्यमातून ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगले खेळताना दिसेल.

प्रशिक्षक कुहेली गांगुलीमुळे ती या पदापर्यंत पोहोचू शकली असल्याचे तेजस्विनीने सांगितले. तिच्या प्रशिक्षकाने तिला कधीही निराश होऊ दिले नाही आणि स्वप्नांच्या प्राप्तीसाठी नेहमी प्रोत्साहित केले. तेजस्विनीचा कोच देखील एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज राहिले आहेत. अशा परिस्थितीत तेजस्विनी त्यांच्याकडून बरेच काही शिकण्याचा प्रयत्न करत राहते.

नेमबाज तेजस्विनी सावंत
विराटच्या कर्णधारपदाबाबत सुरेश रैनाने दिली खास प्रतिक्रिया

तेजस्विनी म्हणाली की कोरोना कालावधीतही मी माझे प्रशिक्षण थांबवले नाही. मी खूप कठोर प्रशिक्षण केले आहे आणि त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे . आता मला माझे सर्व घेतलेले प्रशिक्षण ऑलिम्पिकमध्ये समर्पित करायचे आहे''. तेजस्विनीने राष्ट्रकुल स्पर्धेत तीन वेळा सुवर्ण पदक जिंकले आहे. तेजस्विनी टोकीयोवरुणही सुवर्ण पदक घेऊन जिंकून येईल असा तिला आत्मविश्वास आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com