Tokyo Olympics: खेळाडूंच्या गोटात कोरोनाचा शिरकाव

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2021) सुरू होण्यास अवघे 14 दिवस शिल्लक आहेत.
Tokyo Olympics: खेळाडूंच्या गोटात कोरोनाचा शिरकाव
Tokyo Olympics: खेळाडूंच्या गोटात कोरोनाचा शिरकाव Saam Tv

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2021) सुरू होण्यास अवघे 14 दिवस शिल्लक आहेत. त्याआधी अॅथलीट्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. लिथुआनिया आणि इस्रायलमधील प्रत्येकी 1-1 अ‍ॅथलीट कोविड -19 पॉझिटिव्ह (COVID-19) आल्याचे समोर आले आहे. जपानमधील (JAPAN) कोरोनाच्या वाढत्या रुगणसंख्येमुळे ऑलिम्पिक आयोजन समितीने गुरुवारी (8 जुलै) बंद स्टेडियममध्ये हे खेळ आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी ऑलिम्पिकशी संबंधित 12 कर्मचारी कोरोना संक्रमित असल्याचे आढळले होते. त्यानंतर टोकियोमधील ओलिम्पिक गाव आठवडाभर बंद होते. त्यासोबतच गावात रुग्णालय बांधण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (At the Olympics, two athletes have tested positive for corona)

कोरोना विषाणूने जपानी सरकारला आधीच त्रास दिला आहे. जपान सरकारनेही कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता आणीबाणी जाहीर केली आहे. तथापि, सरकारने असेही म्हटले आहे की ऑलिम्पिकच्या तारखांमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्याचबरोबर ऑलिम्पिक आयोजन दरम्यान प्रेक्षकांच्या उपस्थितीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती ऑलिम्पिक आयोजन समितीने दिल्या आहेत. यासाठी खेळ बंद स्टेडियममध्ये होणार आहेत.

Tokyo Olympics: खेळाडूंच्या गोटात कोरोनाचा शिरकाव
रोहित शर्माच्या कर्णधार पदाबाबत सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

दरम्यान, भारताच्या ऑलिंपिक Olympics पात्र संघातील पहिली तुकडी १७ जूलै रोजी टोकियोसाठी Tokyo रवाना होणार आहे. त्यापूर्वी टोकियोत दाखल होण्यास संयोजकांकडून मनाई करण्यात आल्याची माहिती भारतीय ऑलिंपिक संघटनेचे IOA अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी दिली आहे.

भारताच्या ऑलिंपिक संघटनेची खेळाडूंनी १४ जूलै रोजी टोकियोसाठी निघून तीन दिवसीय कठोर विलगीकरण पूर्ण करावे अशी इच्छा होती. परंतू, टोकियो आयोजक समितीचे सदस्य केट योनेयामा यांच्याकडून प्राप्त झालेल्या झालेल्या पत्रानूसार भारताला अजूनही परवानगी मिळणे बाकी असल्याने १७ जूलैला पाठविण्यावाचून पर्यायच उरलेला नसल्याचे बत्रा यांनी म्हटले आहे.तसेच १७ जूलैला नेमके किती पाठविले जातील याबाबतही बत्रा यांनी खुलासा केलेला नाही.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com