Tennis News ‘टॉयलेट ब्रेक्स’ला लगाम लागणार; एटीपीची नवी नियमावली

सोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) पुढील हंगामापासून नविन नियमांची अंमलबजावणी करणार असून ज्यामुळे टेनिसपटूंच्या कोर्टवरील ‘टॉयलेट ब्रेक्स’ला लगाम लागणार आहे
Tennis News ‘टॉयलेट ब्रेक्स’ला लगाम लागणार; एटीपीची नवी नियमावली
Tennis News ‘टॉयलेट ब्रेक्स’ला लगाम लागणार- साम टिव्ही


न्यूयॉर्क : असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) पुढील हंगामापासून नविन नियमांची अंमलबजावणी करणार असून ज्यामुळे टेनिसपटूंच्या कोर्टवरील ‘टॉयलेट ब्रेक्स’ला लगाम लागणार आहे. एटीपीच्या या नव्या नियमांमुळे ‘टॉयलेट ब्रेक’सह वैद्यकीय विश्रांतीवरही अनेक बंधने येणार आहेत. Sports News ATP Announces new rules for tennis

काही दिवसांपूर्वी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेदरम्यान ग्रीसचा टेनिसपटू स्टेफिनोस त्सित्सिपासने घेतलेल्या मोठ्या टॉयलेट ब्रेकमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्सित्सिपासचा प्रतिस्पर्धी अँडी मरेनेही त्सित्सिपासवर गंभीर आरोप करताना त्याच्या या मोठ्या विश्रांतीचा सामन्यावर परिणाम झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच हा विषय बऱ्याच दिवसांपासून एटीपीच्या विचाराधीन होता.

२०२२ च्या हंगामातील पहिल्या स्पर्धेपासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, खेळाडूंना तीन मिनिटांपेक्षा जास्त मोठ्या ‘टॉयलेट ब्रेक’ची परवानगी दिली जाणार नाही आणि त्यांना पोशाख बदलण्यासाठी जास्तीत जास्त दोन मिनिटे दिली जातील. तसेच खेळाडूंना पंचांच्या परवानगी शिवाय कोर्टसोडून जाता येणार नाही.

स्पर्धा अधिक कठीण होत असताना खेळाडू सामन्यादरम्यान विश्रांती घेण्यासाठी ‘टॉयलेट ब्रेक’ची पळवाट शोधत होते, त्यामुळे कधीकधी कोर्टवर अप्रिय घटना घडून प्रतिस्पर्धी टेनिसपटूच्या चिंतेत वाढ होत असे.

‘‘एखादा खेळाडू प्रती सामन्यासाठी फक्त एक टॉयलेट ब्रेक घेऊ शकतो. टॉयलेट ब्रेक फक्त सेट ब्रेक दरम्यानच घेता येईल आणि जर एखादा खेळाडू परवानगी दिलेल्या वेळेत तयार नसेल तर त्याच्यावर वेळेचे उल्लंघन लागू होईल,’’ असे एटीपीने एका निवेदनात म्हटले आहे. वैद्यकीय विश्रांतीवर, एटीपीने सांगितले की, ‘प्रत्येक सामन्यात तीन मिनिटांचा एकच टाइम-आउट बदलादरम्यान किंवा सेट ब्रेक दरम्यान घेतला जाऊ शकेल.’ Sports News ATP Announces new rules for tennis

काय आहेत नवे नियम
- प्रत्येक सामन्यात तीन मिनिटांचा एकच टॉयलेट ब्रेक
- ब्रेकसाठी केवळ सेटब्रेक दरम्यान परवानगी
- पोशाख बदलण्यासाठी जास्तीत-जास्त दोन मिनिटे
- वैद्यकीय ब्रेकसाठी केवळ तीन मिनिटे

हे देखिल पहा -

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com