
WTC Final: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ मे रोजी ६ दिवसांसाठी विदेश दौऱ्यावर रवाना झाले होते. यादरम्यान त्यांनी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. बुधवारी ते सिडनीतुन भारतात यायला निघाले.
सिडनीत नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील काही प्रसिद्ध उद्योगपतींची भेट घेतली. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू देखील तिथे उपस्थित होते. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
नरेंद्र मोदी सिडनीत असताना त्यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांची भेट घेतली. एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. ज्यात पॅट कमिन्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हात मिळवणी करताना दिसून येत आहेत. तर स्टीव्ह वॉ त्यांच्या बाजूला उभे आहेत.
या खेळाडूंची भेट होंण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीस यांच्यासह सिडनी हाऊस आणि ऑपेरा हाऊसचा दौरा केला. मंगळवारी नरेंद्र मोदी यांनी सिडनीतील एरिया स्टेडियममध्ये भारतीयांना संबोधित केले.
येत्या काही दिवसात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना इंग्लंडच्या ओव्हलमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. तर भारतीय संघाची एक तुकडी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. हा सामना ७ ते ११ जून दरम्यान खेळला जाणार आहे. (Latest sports updates)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ :
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया:
पॅट कमिंस (कर्णधार), स्कॉट बोलेंड , एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरीस, जोश हेजलवुड, ट्रैविस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, स्टीव स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क,डेविड वॉर्नर
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.