Australian Open 2022: जोकोविचने माघार घेतल्यास असा हाेईल स्पर्धेचा ड्राॅ

आता आयाेजकांना जाेकाेविचच्या वकीलांनी निर्णयाविरुद्ध दिलेल्या आव्हानाच्या निकालाची प्रतिक्षा आहे.
australian open 2022
australian open 2022saam tv

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियन ओपनचे (australian open 2022) आयोजक गतविजेत्या नोव्हाक जोकोविचच्या (Novak Djokovic) दुसऱ्यांदा व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध संभाव्य कायदेशीर आव्हानाची वाट पाहत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे येत्या साेमवारी ही स्पर्धा सुरू होणार आहे. फेडरल इमिग्रेशन मंत्री अ‍ॅलेक्स हॉक यांच्या जाेकाेविचचा व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाने स्पर्धेचा ड्राॅ अनिश्चिततेच्या भाेव-यात सापडला आहे.

australian open 2022
Australian Open 2022: नोव्हाक जोकोविचवर संक्रात; व्हिसा रद्द, देशातून हाेईल हकालपट्टी

जाेकाेविचचा (Novak Djokovic) व्हीसा (visa) रद्द झाल्यानंतर टेनिस वर्तुळात खळबळ उडाली. ऑस्ट्रेलियन ओपन (australlian open) चॅम्पियनच्या कायदेशीर मंडळींनी पहिला सामना सुरू होईपर्यंत ६० तासांपेक्षा कमी कालावधीत त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल विचार करुन ठेवला आहे असंही सांगतिले जात आहे.

ITF च्या तरतुदींनुसार पहिल्या आणि चौथ्या स्थानांदरम्यानचा कोणताही खेळाडू जर माघार घेताे तर त्याच्या जागी पाचव्या मानांकित खेळाडूला स्थान दिले जाते. त्यामुळे जाेकाेविचच्या शिवाय ही स्पर्धा मार्गक्रमण हाेऊ शकले.

आंद्रे रुबलेव्हला मिळेल अव्वल स्थान

इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनच्या (ITF) ग्रँड स्लॅम नियम पुस्तकात स्पष्ट केलेल्या तरतुदींनुसार ऑस्ट्रेलियन ओपन ड्रॉमध्ये फेरबदल हाेऊ शकेल. यामुळे पाचव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हला ड्रॉ शीटमध्ये अव्वल स्थान मिळेल. रशियन खेळाडू जोकोविचऐवजी सर्बियन मिओमिर केकमानोविच खेळेल. आता आयाेजकांना जाेकाेविचच्या वकीलांनी निर्णयाविरुद्ध दिलेल्या आव्हानाच्या निकालाची प्रतिक्षा आहे.

edited by : siddharth latkar

australian open 2022
Rafael Nadal: मेलबर्न समर सेट करंडक जिंकला; 'हे कोर्ट नेहमीच माझ्यासाठी खास'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com