वेस्ट इंडिज दौऱ्यातून आॅस्ट्रेलियाच्या सात खेळाडूंची माघार

वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी निवडलेल्या ऑस्ट्रेलियन (Australia tour of West Indies, 2021) संघात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), डेव्हिड वॉर्नर (David Warner), पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनीस, आणि केन रिचर्डसन सारखे स्टार खेळाडू संघाबाहेर आहेत
वेस्ट इंडिज दौऱ्यातून आॅस्ट्रेलियाच्या सात खेळाडूंची माघार
Senven Players from Australia Cricket team opt to go out of teamTwitter @ICC

मेलबर्न : वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी निवडलेल्या ऑस्ट्रेलियन (Australia tour of West Indies, 2021) संघात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), डेव्हिड वॉर्नर (David Warner), पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनीस, आणि केन रिचर्डसन सारखे स्टार खेळाडू संघाबाहेर आहेत. वास्तविक या सर्व खेळाडूंनी त्यांच्या नावाचा विचार करू नये अशी विनंती ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाला केली होती. या ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये स्मिथने स्वत: दुखापतग्रस्त असल्याचे कारण दिले आहे. ऑस्ट्रेलियन संघाने यापूर्वी वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौर्‍यासाठी 29 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. त्यापैकी 7 खेळाडूंनी संघातून माघार घेतली आहे.

वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौर्‍यावर जाण्यापूर्वीच अशा होती की काही खेळाडू विलगीकरण आणि बायो बबलमध्ये असल्याने माघार घेतील. काही खेळाडू नुकतेच आयपीएलमधून परतले होते, त्या मुळे त्यांना पुन्हा बायोबबल आणि विलगीकरणात राहायचे नाही.

(Australia's 7-star squad withdraws from West Indies tour squad)

या 7 खेळाडूंनी वैयक्तिक कारणे दाखवून त्यांची नावे मागे घेतली आहेत. विशेष म्हणजे कोरोनामुळे आयपीएल पुढे ढकलल्यानंतर सुमारे महिनाभर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना प्रथम मालदीव आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व खेळाडूंना त्यांच्या घरी पोहोचण्यास बराच वेळ लागला होता. ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडीज दौर्‍यावर 5 टी -20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला टी-20 सामना 8 जून रोजी होणार आहे. वेस्ट इंडीजचा दौरा 24 जुलै रोजी संपेल.

ऑस्ट्रेलिया संघ

अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), एश्टन एगर, वेस एगर, जेसन बेहरेन्डॉर्फ, अॅलेक्स कॅरे, डॅन ख्रिश्चन, जोश हेझलवुड, मोईस हेनरिक्स, मिशेल मार्श, बेन मॅकडर्मोट, रिले मेरिडिथ, जोश फिलिप, मिशेल स्टार्क, मायकेल स्वॅपसन, एश्टन टर्नर, अ‍ॅन्ड्र्यू टाय, मॅथ्यू वेड, अ‍ॅडम झांपा.

Edited By - Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com