दाेन पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली अवनी लेखरा
Avani Lekhara

दाेन पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली अवनी लेखरा

टाेकियाे : अॅथलिट प्रवीण कुमारच्या यशानंतर भारतीय नेमबाज अवनी लेखरा Aavani Lekhara हिने आजच्या स्पर्धेत जबरदस्त कम बॅक करीत ५० मीटर रायफलमध्ये कास्य पदक मिळविले. तिच्या कामगिरीमुळे आज या स्पर्धेतील भारताच्या खात्यात १२ वे पदकाचा समावेश झाला आहे.

नेमबाज अवनी हिने यापुर्वी या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आज तिने कास्यपदक मिळविले आहे. ही कामगिरी तिने Rifle 3 Positions SH1 event यामध्ये केली आहे. पॅरालिंपिक स्पर्धेत दाेन पदकांची कमाई करणारी अवनी ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

avani-lekhara-creates-history-became-first-indian-women-to-win-two-medals-in-paralympics

Avani Lekhara
नीरज चाेप्राने मानले सुवर्णपदक विजेत्या अवनी लेखाराचे आभार

अवनीच्या या कामगिरीमुळे देशाची पदक संख्या १२ झालेली आहे. सध्या या स्पर्धेत भारत पदकतालिकेत २७ व्या स्थानावर आहे. दरम्यान क्रीडा जगतातून अवनीच्या कामगिरीचे काैतुक हाेऊ लागले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com