Avesh Khan Celebration: एकही रन न मारता हेल्मेट तोड सेलिब्रेशन करणाऱ्या Avesh Khan ला BCCI चा दणका! केली मोठी कारवाई

BCCI Action On Avesh Khan: शेवटच्या चेंडूवर असं काहीतरी घडलं ज्यामुळे बीसीसीआयने आक्रमक भूमिका घेतली आहे.
Avesh khan
Avesh khan Twitter

RCB VS LSG IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील १५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना २१२ धावा केल्या होत्या.

या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग करत लखनऊ सुपर जायंट्स संघाने शेवटच्या चेंडूवर १ धाव पूर्ण करत १ गडी राखून विजय मिळवला. मात्र शेवटच्या चेंडूवर असं काहीतरी घडलं ज्यामुळे बीसीसीआयने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Avesh khan
Rinku Singh IPL 2023: उमेश यादवच्या 4 शब्दांचा इम्पॅक्ट अन् रिंकूने ठोकले खणखणीत 5 षटकार! काय म्हणाला उमेश यादव? वाचा

या सामन्यात धावांचा पाठलाग करत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने १९.५ षटकात २१२ धावा केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर या संघाला विजय मिळवण्यासाठी केवळ १ धावेची गरज होती. त्यावेळी हर्षल पटेलने चेंडू टाकला. हा चेंडू बॅटला न लागता सरळ यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या हातात गेला.

दिनेश कार्तिक हिट मारणार इतक्यात दोन्ही फलंदाजांनी धाव पूर्ण केली आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाला सामना जिंकून दिला. धाव पूर्ण होताच आवेश खानने जोरदार सेलिब्रेशन करत हेल्मेट फेकले. या कृत्यामुळे बीसीसीआयने आक्रमक भूमिका घेत आवेश खानला चांगलेच फटकारले आहे. (Latest sports updates)

बीसीसीआयने आपल्या अधिकृत साईटवरून आवेश खानच्या या कृत्याचा विरोध केला आहे. तसेच हे कृत्य चुकीचे असल्याचे देखील म्हटले आहे. पुढे त्यांनी लिहिले की, 'आवेश खानला आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे.'बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये येताच आवेश खानने देखील आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, लखनऊ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर २ गडी बाद २१२ धावा केल्या होत्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली होती. तर तर विराट कोहलीने ६१ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून मार्कस स्टोईनिसने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली.

तर निकोलस पूरनने ६२ धावांचे योगदान दिले. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स संघाने १ गडी राखून आपल्या नावावर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com