
Axar Patel Six: भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अंतिम कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे.
तर चौथ्या दिवशी भारतीय संघातील फलंदाज विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले होते.
या डावात अक्षर पटेलने तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान त्याने कुन्हेमनच्या एकाच षटकात २ गगनचुंबी षटकार मारले. (Latest sports updates)
अक्षर पटेल हा गोलंदाजी करताना फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवतो. मात्र फलंदाजी करताना त्याचा रुद्रावतार पाहायला मिळत असतो. चौथ्या दिवशी त्याने विराटसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली.
त्याचे शतक केवळ २१ धावांनी हुकले. त्याने या डावात ११३ चेंडूंचा सामना करत ७९ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार मारले.
तर झाले असे की, भारतीय संघाने आघाडी घेतल्यानंतर अक्षर पटेलने आक्रमक खेळी करायला सुरूवात केली. त्यावेळी गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या कुन्हेमनला त्याने एक गगनचुंबी षटकार मारला.
हा ८० मीटर लांब मारलेला षटकार पाहून विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ देखील आश्चर्यचकित झाले होते. दोघांनी दिलेली रिअॅक्शन सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
विराट आणि अक्षरच्या भागीदारीच्या बळावर भारताने केल्या ५७१ धावा..
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने केलेल्या ४८० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली होती. रोहित ३५ धावा करत माघारी परतला. मात्र शुभमन गिलने डाव सावरत १२८ धावांची खेळी केली.
तर सामन्याचा चौथा दिवस विराटने गाजवला. विराटने चौथ्या दिवशी फलंदाजी करताना करकीर्दीतील २८ वे शतक झळकावले.
त्याने या डावात १८६ धावांची खेळी केली. भारतीय संघ अडचणीत असताना अक्षर पटेलने जबाबदारी स्वीकारत ७९ धावांची खेळी केली.
या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.