
हार्दिक पंड्या फॉर्ममध्ये असल्यावर काय करू शकते हे त्याने गेल्या सामन्यात दाखवून दिलं होतं. साखळी फेरीतील सामन्यात त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. आता हातात चेंडू येताच त्याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
यावेळी त्याने नंबर १ ला असलेल्या बाबर आझमला चांगलाच इंगा दाखवला आहे. बाबरची दांडी गुल केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारताने दिलेल्या ३५७ धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानचा संघ मैदानावर आला होता. सुरुवातीच्या ११ षटकांमध्येच भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला २ मोठे धक्के दिले. इमाम उल हकला जसप्रीत बुमराहने तर बाबर आझमला हार्दिक पंड्याने बाद करत माघारी धाडले.
तर झाले असे की, ' भारतीय संघाकडून ११ वे षटक टाकण्यासाठी हार्दिक पंड्या गोलंदाजीला आला होता. त्यावेळी या षटकातील चौथा चेंडू टप्पा पडताच आत फिरला आणि काही कळायच्या आत बाबर आझमची दांडी गुल करून गेला.
हा भन्नाट चेंडू पाहून बाबर आझम देखील शॉक झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)
भारताचा विजय..
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय पूर्णपणे फसला. कारण भारताच्या टॉप ४ फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
भारताकडून विराट कोहलीने १२२, केएल राहुलने १११ , रोहित शर्माने ५६ आणि शुबमन गिलने ५८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारताने ३५६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १२८ धावांवर ऑल आउट झाला. यासह भारताने हा सामना २२८ धावांनी जिंकला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.