Tokyo Paralympics : पलक काेहलीची जिगरबाज खेळी; झेहराला नमविले

Tokyo Paralympics : पलक काेहलीची जिगरबाज खेळी; झेहराला नमविले
palak kohli

टाेकिया : पुरुषांच्या एकेरीत भारताच्या कृष्णा नगरने प्रतिस्पर्ध्यास नमविल्यानंतर महिलांच्या एकेरीत पलक काेहलीने तुर्कीच्या झेहरा बागलर हिचा पराभव करुन बाद फेरीतील प्रवेशाचा मार्ग नक्की केली आहे. पलकने बागलरला २१-१२, २१-१८ असे हरविले. दरम्यान पलकचा palak kohli बाद फेरीतील प्रवेश हा सुझुकी विरुद्ध बागलर यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे.

आज गट अ मधील एसयु ५ या गटात पलकचा सामना झेहराशी झाला. पहिल्या सेटमध्ये तिने झेहरावर २१-१२ अशी सहज मात केली. त्यानंतरच्या सेटमध्ये झेहराने तिच्या खेळाची रणनिती बदलत गुणांवर पकड मिळविण्याच प्रयत्न केला. पलकने ही तिचे शटल परतावून लावले. दूसरा सेटमध्ये पलकने ११-०७ अशी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत तिने २१-१८ असा सामना जिंकला.

palak kohli
नीरज चाेप्राने मानले सुवर्णपदक विजेत्या अवनी लेखाराचे आभार

दरम्यान बुधवारी पलक कोहली आणि पारुल परमार यांना द्वितीय मानांकित हुइहुई एमए आणि चीनच्या हेफांग चेंग यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला हाेता. badminton-india-palak-kohli-defeats-zehra-baglar-turkey-tokyo-paralympics-sml80

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com