Tokyo Paralympics : बॅडमिंटनपटू कृष्णाची चमकदार कामगिरी
Krishna Nagar

Tokyo Paralympics : बॅडमिंटनपटू कृष्णाची चमकदार कामगिरी

टाेकियाे : येथे सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेतील बॅडमिंटन क्रीडा प्रकारत पुरुष एकेरी (SH 6) गटात भारताच्या कृष्णा नगरने मलेशियाच्या दीदीन तारेसाेहचा सरळ सेटमध्ये पराभव केला. कृष्णाने दीदीनला २२-२०, २१-१० असे हरविले. badminton-krishna-nagar-seizes-the-game-against-malaysian-didin-taresoh-tokyo-paralympics-sml80

कृष्णा नगरने Krishna Nagar सेटमध्ये दीदीनवर उत्तम खेळी केली. परंतु दीदीनने त्यास काही काळ जेरीस आणले हाेते. पहिल्या सेटमध्ये दीदीनने आक्रमक खेळी करीत तीन गुण मिळवित बराेबरी साधली. त्यानंतर कृष्णाने सलग दाेन गुण मिळवित २२-२० असा सेट जिंकला.

Krishna Nagar
IPL 2021 : वॉशिंग्टन सुंदरला वगळले; RCB ने निवडलं या खेळाडूस

दुस-या सेटमध्ये कृष्णाने जिगरबाज खेळी करीत सामन्यावर पकड मिळवित विजय नाेंदविला. हा सेट त्याने २१-१० असा सहज जिंकला. कृष्णाच्या कामगिरीवर भारतीयांचा काैतुकाचा वर्षाव सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com