एकेरीतील पदकाची बॅडमिंटनपटू साई प्रणितवर धुरा

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू बी साई प्रणीत याने आगामी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्याबाबत विश्वास व्यक्त केला. २८ वर्षीय साई ऑलिंपिकच्या एकेरीत पात्र ठरणारा एकमेव खेळाडू आहे
एकेरीतील पदकाची बॅडमिंटनपटू साई प्रणितवर धुरा
भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू बी साई प्रणीत याने आगामी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्याबाबत विश्वास व्यक्त केला- Saam Tv

हैदराबाद : भारताचा India आघाडीचा बॅडमिंटनपटू Badminton बी साई प्रणीत B Sai Praneeth याने आगामी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्याबाबत विश्वास व्यक्त केला. २८ वर्षीय साई ऑलिंपिकच्या Olympics एकेरीत पात्र ठरणारा एकमेव खेळाडू आहे, ज्याच्याकडून भारताला सूवर्णपदकाच्या Gold Medal मोठ्या आशा आहेत. Badminton Player Sai Praneeth Hopeful of getting medal in Olympics

भारतीय बॅडमिंटन इतिहासामध्ये आजतागायत कुठल्याही पुरुष बॅडमिंटनपटूने ऑलिंपिकची उपउपांत्यपूर्व फेरी गाठलेली नाही,असा पराक्रम करणारा साई पहिलाच बॅडमिंटनपटू ठरला आहे. तो सध्या जगातील क्रमवारीत १५ व्या स्थानावर आहे. अर्जुन पुरस्कार Arjun Awardee प्राप्त साईने २०१९ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकत पुरुष एकेरीमधील ३६ वर्षांपासूनचा प्रतिक्षा संपवली होती.

हे देखिल पहा

साई प्राणितनेही जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील या पदकाने ऑलिंपिक पदक जिंकण्याच्या स्वप्नाबाबत आत्मविश्वास दिल्याचे सांगत ऑलिंपिक बाबत अत्यंत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लगतच्या काळात खेळाचे हंगाम न झाल्याने मिळालेली विश्रांती त्याच्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचेही म्हटले आहे.

ऑलिंपिकच्या वेबसाईटवरील एका व्हिडिओत बोलताना त्याने म्हटले आहे की, "सध्याच्या परिस्थितीत कोणता खेळाडू कुठे आहे व तो स्पर्धेसाठी कसा सराव करतोय याचा कोणालाही थांगपत्ता नाही.हे सर्व खेळाडूंसाठी नवीन आहे.त्यात आघाडीचे खेळाडू नक्कीच दबावात असतील,आणि ही माझ्यासाठी चांगली गोष्ट असेल." या स्पर्धेसाठी साई प्रणीत तंदुरुस्त असून उत्तम स्थितीत आहे,याउलट बाकी खेळाडूंवर मानसिक तसेच शारीरिक संतुलन साधण्याचा दबाव असेल.

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू बी साई प्रणीत याने आगामी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्याबाबत विश्वास व्यक्त केला
भारतीय ऑलिंपिकपटूंना १७ जुलै पूर्वी टोकियोत प्रवेश नाही

"जेव्हा तुम्ही सातत्याने स्पर्धा खेळत असता तेव्हा आपणास आपल्या कामगिरीची कल्पना येत असते. सराव करत असताना सगळ्या ठीक भासणाऱ्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव स्पर्धेत येत असतो.या सर्व परिस्थितीत अनुभवी खेळाडूंवर स्वतःची कामगिरी राखण्याचा दबाव असेल व याचाच मला फायदा होईल" असेही बी. साई प्रणीतने म्हटले आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com