Tasnim Mir: १६ वर्षीय तसनीम मीरने रचला इतिहास, पीव्ही सिंधू-सायना नेहवालही करू शकले नव्हते

तिने वयाच्या १४ व्या वर्षी राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियन (U-19) जिंकले आणि १३ वर्षाखालील, १५ वर्षाखालील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरी प्रकारात राष्ट्रीय मुकुटही जिंकला.
Tasnim Mir
Tasnim Mirsaam tv

गुजरात : बॅडमिंटनपटू तस्नीम मीर (tasnim mir) ही १९ वर्षाखालील मुलींच्या एकेरीत जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. १६ वर्षीय तसनीम मीरने बुधवारी हे यश मिळविले आहे. (badminton player tasnim mir becomes first indian to bag world no 1 status in U19 girls singles)

तस्नीम (tasnim mir) गेल्या वर्षीच तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पहिल्या क्रमांकावर पोहोचली हाेती. ही कामगिरी करणारी ती देशातील पहिलीच खेळाडू ठरली. पीव्ही सिंधू (p v sindhu), सायना नेहवाल (saina nehwal) या दिग्गज खेळाडूंनाही ज्युनियर गटात पहिले स्थान पटकाविण्यात यश आले नव्हते.

Tasnim Mir
India Open 2022: किदांबी श्रीकांतसह ७ भारतीय खेळाडूंवर संक्रात; काेविड १९ ची लागण

या यशानंतर पीटीआयशी बाेलताना तस्नीम म्हणाले खरंतर मला हे अपेक्षित हाेते असं मी म्हणणार नाही. मी प्रथम क्रमांकावर पाेहचेन असे वाटत नव्हतं कारण काेराेनामुळे अनेक स्पर्धांना खंड पडला हाेता. बल्गेरिया, फ्रान्स आणि बेल्जियममधील स्पर्धा मी जिंकल्या. ही कामगिरी माेलाची ठरली. तस्नीम जगातील प्रथम खेळाडू बनल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला हाेता. हा क्षण माझ्यासाठी माैल्यावान असल्याचे तिने गुवाहाटी येथून पीटीआयशी बाेलताना नमूद केले.

मी आतापासून वरिष्ठ गटावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे आणि पुढील महिन्यात इराण आणि युगांडा येथे स्पर्धा खेळण्यास उत्सुक असल्याचे तस्नीम हिने सांगितलं. सध्या महिला एकेरीत ६०२ व्या क्रमांकावर असणारी तस्नीम आता वरिष्ठ क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.ती म्हणाली जर मी काही चांगली कामगिरी करू शकले आणि वर्षाअखेरीस टॉप २०० मध्ये जाऊ शकले तर ते माझ्यासाठी अतुलनीय ठरेल.

तसनीम गेल्या चार वर्षांपासून गुवाहाटी येथील आसाम बॅडमिंटन अकादमीमध्ये इंडोनेशियन प्रशिक्षक एडविन इरियावान यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. आम्हाला पुरुष खेळाडूंसोबत सराव करायला मिळतो. त्यामुळे माझा खेळ सुधारण्यास मदत झाली. मला बॅडमिंटनचे धडे माझे वडील इरफान यांच्याकडून मिळाले. ते स्वतः एक बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत. मेहसाणा पोलिसात ते एएसआय म्हणून कार्यरत आहेत. ते मला सात आठ वर्षांची असताना खेळण्यासाठी सोबत घेऊन जायचे.

तस्नीमचा धाकटा भाऊ मोहम्मद अली मीर हा गुजरात राज्य ज्युनियर चॅम्पियन गुवाहाटी येथे तिच्यासोबत प्रशिक्षण घेतो. तिने वयाच्या १४ व्या वर्षी राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियन (U-19) जिंकले आणि १३ वर्षाखालील, १५ वर्षाखालील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरी प्रकारात राष्ट्रीय मुकुटही जिंकला. तस्नीमने २०१८ मध्ये हैदराबाद आणि नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय सब-ज्युनियर रँकिंग टूर्नामेंटमध्ये १५ वर्षाखालील एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपदही जिंकले. रशियातील २०१९ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये,ती ३२ व्या फेरी पर्यंत गेली परंतु त्याच वर्षी इंडोनेशियामध्ये झालेल्या आशियाई १७ व १५ वयाेगटाच्या ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद जिंकण्यासाठी ती परतली. काठमांडू येथे प्रेसिडेंट कप नेपाळ ज्युनियर इंटरनॅशनल सिरीज २०२० मध्येही तिने विजेतेपद पटकावले.

मला माझ्या खेळातील माझ्या तग धरण्याची क्षमता आणि मानसिक पैलूंवर काम करावे लागेल, जे एक मोठी भूमिका बजावेल. मला माझ्या शॉट्सवर विश्वास आहे पण मनावर ताबा मिळविणे महत्वाचे आहे असे तस्नीमने नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com