Commonwealth Games 2022 : 'बजरंग ' पावला! पुनिया, साक्षी मलिकचा गोल्डन डाव, कॉमनवेल्थमध्ये इंडिया शायनिंग

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे.
bajrang punia and sakshi malik wins gold medal
bajrang punia and sakshi malik wins gold medal saam tv

बर्मिंगहम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. अशातच भारताचा प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनियाचीही (Bajrang Punia) या स्पर्धेत सुवर्ण झळाली पाहायला मिळाली आहे. बंजरंगने अप्रतिम खेळ करत ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकण्याची चमकदार कामगिरी केलीय. तसेच साक्षी मलिकनेही (Sakshi Malik) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून राष्ट्रकुल पदकांची हॅट्ट्रिक केलीय.

कॅनडाच्या २१ वर्षांच्या लॅचलीन मक्नेलचा बजरंगने ९-२ असा पराभव केला. विशेष म्हणजे बजरंगचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे सलग दुसरे (Gold Medal) सुवर्ण पदक आहे. 2018 मध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यानं सूवर्ण पदकावर नावं कोरलं होतं. बजरंगच्या सूवर्ण पदकामुळे भारताच्या पदक तालिकेत भर पडली आहे. त्यामूळे भारताला आतापर्यंत ७ सूवर्ण पदक मिळाले आहेत.

bajrang punia and sakshi malik wins gold medal
Gadchiroli : नक्षलवाद्यांनी जंगलात पुरली स्फोटके, पोलिसांची गस्त सुरू होती, त्यानंतर....

बजरंग पुनियाने पहिल्या फेरीत दमदार कामगिरी करत चार गुण मिळवून मॅक्लेन विरोधात आघाडी घेतली. त्यानंतर मॅक्नेलनेही दुसऱ्या फेरीत जशास तसं उत्तर देण्यासाठी कंबर कसली. पण मॅक्लेनला दुसऱ्या फेरीत दोन गुणांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर बजरंग पुनियाने मॅक्लेनला रिंगच्या बाहेर ढकलल्याने बजरंगने पुन्हा आघडी चार गुण प्राप्त केले.

बजरंग पुनिया एवढ्यावरच थांबला नाही. तर पुनियाने मॅक्लेनच्या पायावर आक्रमण करत त्याला पुन्हा रिंगच्या बाहेर ढकलले. त्यानंतर बजरंगला एक गुण अधिक मिळाला. सामन्याच्या अखेरीस बजरंगने आणखी दोन गुण मिळवत ९-२ ने सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.

साक्षी मलिकने (Sakshi Malik) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून राष्ट्रकुल पदकांची हॅट्ट्रिक केलीय. साक्षीने कॅनडाच्या अॅना गोडिनेझ गोंझालेझचा पराभव केला. परंतु, पहिल्या डावात साक्षी ४-० ने पिछाडीवर होती. मात्र, दुसऱ्या डावात साक्षीने पिन डाऊन डाव टाकत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. सामना 4 - 4 अशा बरोबरीत होता. मात्र साक्षीने पिन डाऊन हा मोठा डाव खेळला आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सूवर्ण झळाली घेतली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com