Women's Premier League: पाच संघांच्या विक्रीतून BCCIची 4669 कोटींची कमाई, अहमदाबाद संघासाठी अदानींनी मोजली सर्वाधिक किंमत

अदानी स्पोर्ट्सलाइन प्रायव्हेट लिमिटेडने अहमदाबाद फ्रँचायझी 1289 कोटींना विकत घेतली.
WPL
WPL SAAM TV

Women's Premier League Team: आयपीएलच्या महिला संघांचा मुंबईत लिलाव पार पडला. लीग वुमन्स प्रीमियर लीग (WPL) म्हणून ओळखली जाईल. पहिल्या सत्रासाठी पाच संघांचा समावेश असेल. या 5 संघांसाठी एकूण 17 कंपन्यांनी बोली लावली, त्यात 7 आयपीएल फ्रँचायझींचा समावेश आहे. अखेर तीन आयपीएल फ्रँचायझी आणि इतर दोन कंपन्यांना यात यश मिळाले. संघांच्या लिलावातून बीसीसीआयला (BCCI)  4 हजार 669 कोटी रूपयांची कमाई झाली आहे. 

सर्वाधिक बोली लावलेल्या 5 ठिकाणांच्या आधारे संघांचा लिलाव करण्यात आला. अदानी समूहाच्या कंपनीने अहमदाबादसाठी सर्वात मोठी बोली लावली. वुमन्स प्रीमियर लीग फ्रँचायझी अहमदाबादसाठी 1289 कोटींना विकत घेण्यात आली. (Sport News)

WPL
Surya Kumar Yadav: सूर्यकुमार जगात भारी! पटकावला सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूचा पुरस्कार

अदानी स्पोर्ट्सलाइन प्रायव्हेट लिमिटेडने अहमदाबाद फ्रँचायझी 1289 कोटींना विकत घेतली. मुंबई इंडियन्सच्या इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईसाठी बोली जिंकली. मुंबईची फ्रँचायझी 921.99 कोटींना विकत घेतली. रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने बंगळुरू फ्रँचायझी 901 कोटींना विकत घेतली.

WPL
IND vs NZ T20 : पहिल्या टी-20 सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का; सलामीवीर फलंदाजच मालिकेबाहेर!

दिल्ली कॅपिटल्सच्या मालकीच्या JSW GMR क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडने 810 कोटींची बोली लावून दिल्लीसाठी फ्रेंचायझी विकत घेतली. लखनौसाठी, कॅप्री ग्लोबल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडने सर्वाधिक 757 कोटी रुपयांची बोली लावली. अशाप्रकारे बीसीसीआयला या 5 संघांच्या विक्रीतून एकूण 4670 कोटींची कमाई झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com