
क्रिकेट चाहत्यांना एकदिवशीय क्रिकेट वर्ल्ड कपची उत्सुकता लागलीय. ऑक्टोबर महिन्याच्या ५ तारखेपासून वर्ल्ड कपच्या सामन्याला सुरूवात होणार आहे. यंदा ही स्पर्धा भारतात होणार असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board Control Cricket of India) प्रमोशन करण्यात कोणतीच कसर सोडत नाहीये. वर्ल्ड कपसाठी बीसीसीआय ४ लाख तिकिटांची विक्री करणार आहे. तसेच बीसीसीआयनं क्रिकेट सामन्यासाठी गोल्डन तिकीट देत आहे.
ऑक्टोबर ५ ते 19 नोव्हेंबरदरम्यान चालणाऱ्या या क्रिकेट महासंग्राम पाहण्यासाठी बीसीसीआय (BCCI) भारतातल्या स्टार आयकॉन्सनला निमंत्रण देत आहे. स्टार आयकॉन्सनला निमंत्रण देण्यासाठी बीसीसीआयनं एक विशेष तिकीट बनवलंय. या तिकिटाला 'गोल्डन तिकीट(Golden Ticket) फॉर इंडिया आयकॉन्स'(India icons) असं नाव देण्यात आलंय. (Latest news on World cup)
या गोल्डन तिकिटाचा पहिला मान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देण्यात आला. वर्ल्ड कपच्या स्पर्धेचं पहिलं गोल्डन तिकीट त्यांना सन्मानपूर्वक दिलं गेलं. त्यानंतर आता दुसरं तिकिट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना देण्यात आलंय. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सचिन तेंडुलकर यांच्या घरी जाऊन वर्ल्ड कपचं गोल्डन तिकीट त्यांना दिलं. याचा फोटो बीसीसीआयनं 'एक्स' (आधीचे ट्विटर) या सोशल साईटवर शेअर केलाय.
या फोटोला बीसीसीआयनं एक कॅप्शनही दिलंय. यात म्हटलंय. 'हा एक खास क्षण आहे, 'गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स' कार्यक्रमांतर्गत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना गोल्डन तिकीट दिलं'. दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ८ सप्टेंबरपासून तिकिटांची विक्री सुरू करत आहे. जास्तीत जास्त उत्साही क्रिकेट चाहत्यांना सामावून घेण्यासाठी बीसीसीआय मोठ्या संख्येने तिकिटांची विक्री करणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ८ सप्टेंबरपासून तिकिटांची विक्री सुरू करत आहे. जास्तीत जास्त उत्साही क्रिकेट चाहत्यांना सामावून घेण्यासाठी बीसीसीआय मोठ्या संख्येने तिकिटांची विक्री करणार आहे. ज्या क्रिकेटप्रेमींना सामन्यांचे तिकीट घ्यायचे आहे, त्यांना अधिकृत वेबसाईट https://tickets.cricketworldcup.com. वर जाऊन तिकीट खरेदी घेता येईल.
एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड संघादरम्यान सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. तर यजमान टीम इंडियाचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वात चुरशीचा ठरणारा भारत-पाकिस्तानदरम्यानचा सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.