'विराट कोहली'च्या कर्णधार बदलाच्या चर्चांना ब्रेक; BCCI नं दिले उत्तर

भारताचा ऑल-फॉर्मेट कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) लवकरच भारताच्या वनडे आणि टी -20 कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे.
'विराट कोहली'च्या कर्णधार बदलाच्या चर्चांना ब्रेक; BCCI नं दिले उत्तर
'विराट कोहली'च्या कर्णधार बदलाच्या चर्चांना ब्रेक; BCCI नं दिले उत्तर Twitter

भारताचा ऑल-फॉर्मेट कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) लवकरच भारताच्या वनडे आणि टी -20 कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. टी -20 विश्वचषकानंतर कोहली मर्यादित षटकांच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याच्या बातम्या माध्यमांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत. त्याच्या जागी आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाची (Team India) कमान सांभाळेल असही म्हटलं आहे. मात्र, आता बीसीसीआयने या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या आहेत.

दावा फेटाळून लावताना बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी माध्यमांना सांगितले, "हे सर्व बकवास आहे. असे काहीही होणार नाहीये. हे कर्णधार पद बदलण्याच्या चर्चा तुम्ही मीडियावाले बोलत आहात. बीसीसीआयने या मुद्यावर अजून कोणताचा विचार केला नाही त्यामुळे विराटच कर्णधार राहणार असल्याची माहिती धुमाळ यांनी दिली आहे.

'विराट कोहली'च्या कर्णधार बदलाच्या चर्चांना ब्रेक; BCCI नं दिले उत्तर
IND vs ENG: मालिकेचा निकाल लागला; 'या' दिवशी होणार पाचवा सामना

याआधी माध्यामांनी खुलासा केला होता की विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा मर्यादित षटकांचा कर्णधार असेल. टीओआयच्या अहवालानुसार, लवकरच विराट कोहली स्वतः बीसीसीआयच्या सहकार्याने ही मोठी घोषणा करणार आहे. या संदर्भात बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत टाइम्स ऑफ इंडियाने लिहिले, “विराट स्वतः ही घोषणा करणार आहे. त्याला असे वाटते की विराटला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि तो नेहमीच जगातील सर्वोत्तम फलंदाज बनला पाहिजे".

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले, "सध्या कोहली (32), जो सध्या सर्व फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करतो आणि भारताचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्याने रोहित शर्माशी याबाबत चर्चा केली आहे." कोहलीला त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदामुळे खूप दबाव आहे आणि त्याचा फलंदाजीवर परिणाम होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com