BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या मनात आहे तरी काय ? 'या' ट्विटमुळं संभ्रम

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी एक ट्विट केल्यानं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
sourav ganguly
sourav gangulySaam TV

मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी (Sourav Ganguly) एक ट्विट केल्यानं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. गागुलीनं नवी इनिंग सुरु करण्याचे संकेत ट्विटरच्या माध्यमातून दिले आहेत. बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आज बुधवारी एक ट्विट केलं आहे. 'मी काहीतरी नवीन सुरु करण्याचा प्लान करत आहे. ज्यामुळे अनेक लोकांना मदत करता येईल, असं गांगुली यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गांगुली यांच्या या ट्विटमुळं अनेक जण संभ्रमात पडले होते. गांगुलीनं बीसीसीआयचा राजीनामा दिला असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, सौरव गांगुलीनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay shah) यांनी एएनआयशी बोलताना दिलं आहे.

sourav ganguly
T-20 बंदच करा, फक्त विश्वचषक स्पर्धा खेळवा, रवी शास्त्री म्हणाले...

सौरव गांगुली यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, १९९२ रोजी क्रिकेटचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर आता २०२२ मध्ये क्रिकेटमधील ३० वर्षे पूर्ण होत आहेत. आजपर्यंत क्रिकेटनं मला खूप काही दिलं. सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्हा सर्वाचं सहाकार्य आणि प्रेम मिळालं. माझ्या क्रिकेटच्या प्रवासात जे कुणी माझ्यासोबत होते, त्या प्रत्येक व्यक्तीचा मी आभारी आहे.

मला ज्यांनी सहाकार्य केलं आणि माझ्या यशप्राप्तीमध्ये ज्यांनी मला मदत केली त्यांचेही आभार. मी आज एक नवीन काहीतरी सुरु करण्याचा प्लॅन करत आहे. मला आशा आहे की, माझ्या नव्या चॅप्टरची सुरवात झाल्यावर तुम्ही मला सहकार्य कराल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com