
Team India News : टी-२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत भारतीय संघाला फार चांगली कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत टीम इंडिया सेमीफायनलला स्पर्धेबाहेर गेली. या पराभवानंतर बीसीसीआयने टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय क्रिकेट फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या कर्णधाराचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध मालिका होईल, या मालिकेसाठी बीसीसीआयने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. (Latest Marathi News)
जानेवारी महिन्यात टीम इंडिया (Team India) श्रीलंकेला भिडणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआय वनडे आणि टी-२० सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार निवडण्याची शक्यता आहे. वनडे सामन्यांसाठी रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी कायम असेल. तर हार्दिक पांड्या टी-२० सामन्यांसाठी टीम इंडियांचा मदार सांभाळताना दिसू शकतो. भारतीय टीम जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळण्यात येणार आहे.
बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, 'आताच सर्व जाहीर करणे फार घाईचे ठरेल. आम्ही आता विचार करत आहोत की, वनडे आणि टी-२० सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार निवडणे योग्य की अयोग्य याबाबत विचार सुरू आहे. या निर्णयामुळे एका खेळाडूवरील कामाचा भार कमी होऊ शकतो. आम्हाला टी-२० फॉरमॅटसाठी नव्या दृष्टीकोनाची आवश्यकता आहे. २०२३ साली भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या अनुषंगाने टीम इंडियाचा विचार करणे आवश्यक आहे'.
टीम इंडियाचा प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या कर्णधार नियुक्ती केल्यामुळे रोहित शर्माला टी-२० सामन्याचे कर्णधारपद सोडावं लागणार आहे . मात्र, यावर बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले की, 'सदर निर्णय हा रोहित शर्मानं टी-२० सामन्याचे कर्णधारपद सोडण्यासाठी नाही, तर रोहितचा भविष्यातील कामाचा भार कमी करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. आम्हाला वाटते की, टी-२० टीमसाठी नव्या दृष्टीकोन आणि युवा खेळाडूंची गरज आहे'.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.