IPL 2023: आरसीबीचे ३.२० कोटी पाण्यात! IPL तोंडावर असताना स्टार फलंदाजाने घेतली माघार..

ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच आरसीबी संघाला एक मोठा धक्का बसला आहे
RCB
RCBSaam tv

Will jacks ruled out of ipl: आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेपूर्वी सर्व संघांनी कसून सराव करायला सुरुवात केली. यावेळी देखील फाफ डू प्लेसी आरसीबी संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच आरसीबी संघाला एक मोठा धक्का बसला आहे. (Latest sports updates)

RCB
IPL 2023 : यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार नाहीत काही स्टार खेळाडू; कारणंही आली समोर

आयपीएल स्पर्धा तोंडावर असताना आरसीबी संघातील फलंदाज विल जॅक्स आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाला आहे. विल जॅक्सने दक्षिण आफ्रिका टी -२० लीगमध्ये जोरदार कामगीरी केली होती.

त्याला आयपीएल २०२३ स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात आरसीबी संघाने ३.२० कोटी खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते.

RCB
Ind vs Aus: टेस्ट तर जिंकले मात्र वनडे मालिका जिंकणं कठीण! ऑस्ट्रेलियाचा 'हा' दमदार रेकॉर्ड एकदा पाहाच..

सध्या इंग्लंड आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या दौऱ्यावर असताना विल जॅक्स दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

बांगलादेश संघाविरुध्द झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामात तो खेळताना दिसून येणार नाहीये.

विल जॅक्सच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत खेळलेल्या १०९ टी -२० सामन्यांमध्ये २८०२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २३ अर्धशतके झळकावली आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com