
ICC One Day Ranking: आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने आठव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. मोहमद सिराज हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. दरम्यान, भारताच्या या जबरदस्त कामगिरीचा पाकिस्तानला मोठा फायदा झाला आहे. (Latest Marathi News)
आशिया चषक स्पर्धा जिंकून सुद्धा टीम इंडियाचं (Team India) नुकसान झालं आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेनंतर आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये पाकिस्तानचा संघ पुन्हा अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. तर भारतीय संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत भारत आणि पाकिस्तान यांचे प्रत्येकी 115 गुण आहे. मात्र खेळलेले सामने आणि विजयाच्या टक्केवारीत पाकिस्तान वरचढ ठरला असून टीम इंडियाला फटका बसला आहे.
पाकिस्तानचे (Pakistan) 27 सामन्यात 3102 पॉईंट्स असून त्यांची रेटिंग 115 इतकी आहे. तर भारताने 41 सामन्यात 4701 पॉईंट्स मिळवले असून भारताची देखील 115 रेटिंग आहे. ऑस्ट्रेलियाने 28 सामन्यात 3166 पॉईंट्ससह 113 रेटिंग मिळवले आहेत. कमी सामन्यात जास्त पॉईंट्स असल्याने पाकिस्तान हा टीम इंडियावर वरचढ ठरला आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेदरम्यान अव्वल स्थानी होता. पण, वनडे 5 सामन्याची मालिका 3-2 ने गमावल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वी भारताला पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान होण्याची संधी आहे.
कारण, लवकरच ऑस्ट्रेलियन संघ भारतात खेळण्यासाठी येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 सप्टेंबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जाणार आहे. ही मालिका जिंकून टीम इंडियाला पुन्हा वनडेत अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.