Roger Federar : रॉजर फेडररचा 'टेनिस'ला अलविदा; पत्रातून व्यक्त केल्या भावना

टेनिसचा बादशाह रॉजर फेडररनं अखेर आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
Roger Federar Retirement
Roger Federar RetirementTwitter

Roger Federar Retirement : क्रिडाविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टेनिसचा (Tennis) बादशाह रॉजर फेडररनं अखेर आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पत्र पोस्ट करत आपण निवृत्ती घेणार असल्याचं त्यानं जाहीर केलंय. पुढील आठवड्यात होणाऱ्या लेवर कप स्पर्धेनंतर आपण निवृत्त होणार असल्याचं रॉडर फेडररनं या पत्रामध्ये नमूद केलं आहे. (Roger Federar Retirement Latest News)

Roger Federar Retirement
T20 World Cup : पाकिस्तानच्या संघाची घोषणा; खतरनाक फलंदाज बाहेर

काही दिवसांपूर्वी सेरेना विल्यम्स हिने आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. या घोषणेतून टेनिस (Sport) चाहत्यांना पूर्णपणे सावरता आलेलं नाही. तोच आता रॉजर फेडररनं आपण निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. पुरुष टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपली व्यावसायिक कारकीर्द संपवण्याची घोषणा केली आहे.

रॉजर फेडरननं पत्रात काय म्हटलंय?

'मी आता ४१ वर्षांचा आहे. गेल्या २४ वर्षांत मी जवळपास १५०० हून अधिक सामने खेळलो आहे. पण माझ्या या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये कुठे थांबायचं, हे मला ठरवायला हवंट, असं रॉजर फेडररनं आपल्या पत्रात म्हटलं आहे. रॉजर हा वर्ल्ड टेनिसमध्ये दीर्घकाळ अव्वल क्रमांकावर राहिलेला आहे. (Roger Federar Todays News)

Roger Federar Retirement
Aurangabad News : रक्षकच बनला भक्षक! चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच व्यापाऱ्याला लुटलं

इतकंच नाही तर, त्याने आपल्या पत्रात पत्नी मिर्कालाही धन्यवाद दिले आहेत.'माझे पहिल्या सामन्याआधी पत्नी मिर्कालाने मला खूप प्रोत्साहन दिलं होतं. त्यावेळी ती ८ महिन्यांची गर्भवती होती. पण तिने तेव्हा स्पर्धेतल्या खूप साऱ्या मॅचेस पाहिल्या होत्या. २० वर्षांहून जास्त काळ ती माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली', असं त्यानं या पत्रात नमूद केलं आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com