
Border-Gavaskar Trophy-बहुप्रतिक्षित असलेली बॉर्डर- गावसकर ट्रॉफी उद्यापासून सुरु होणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण या मालिकेनंतर कळून जाईल की, भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दुसऱ्यांदा प्रवेश करणार का नाही. या मालिकेचा क्रेझ इतका वाढला आहे की, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ही मालिका मानाची समजल्या जाणाऱ्या ऍशेस पेक्षाही मोठी असल्याचे सांगितले आहे.
ही मालिका सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघातील काही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. तरीदेखील दोन्ही संघ या मालिकेत पूर्ण जोर लावताना दिसून येतील. दरम्यान ही मालिका जिंकून भारतीय संघाला ३ मोठे फायदे होणार आहे. (Latest Sports Update)
सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी..
भारतीय संघ ही मालिका जिंकून सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाकडे ही शेवटची संधी असणार आहे. जर भारतीय संघाने या मालिकेत चांगली कामगिरी केली तर, भारतीय संघाचा अंतिम फेरीत पोहचण्याचा मार्ग मोकळा होऊन जाईल.
तीनही फॉरमॅटमध्ये नंबर १ बनण्याची संधी...
भारतीय संघाने ही मालिका जर २-० ने किंवा ३-० ने आपल्या नावावर केली तर, भारतीय संघ पुन्हा कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी येऊ शकतो. सध्या भारतीय संघ वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानी आहे. जर भारतीय संघाने कसोटी रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळवले तर, असा पराक्रम करणारा भारतीय संघ दुसरा संघ ठरू शकतो. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने असा कारनामा केला होता.(Team India)
सलग चौथ्यांदा मालिका नावावर करण्याची नामी संधी..
तसेच भारतीय संघ आपला विजयरथ कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. २०१२ पासून भारतीय संघाने सर्व मालिका आपल्या नावावर केल्या आहेत. तर २०१७ मध्ये भारतीय संघाने केवळ एक कसोटी सामना गमावला आहे. त्यामुळे यावेळी भारतीय संघ सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरू शकतो.
मालिका जिंकताच टीम इंडियाला होणार हे ३ मोठे फायदे;असा पराक्रम करणारा केवळ दुसराच संघ ठरेल
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.