Viral Cricket Video: दिव्यांग गोलंदाजाची कमाल! एका पायावर धावत टाकला भल्या भल्यांना लाजवेल असा चेंडू - VIDEO

Baller Bowling On One Leg: एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
viral cricket video
viral cricket videoTwitter

Disability Cricket: क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यात पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत काय काय होईल काहीच सांगता येत नाही. हेच कारण आहे की,उत्साह आणि रोमांच शेवटच्या चेंडपर्यंत कायम राहतो.

हा खेळ खेळण्यासाठी खेळाडू धडपडत असतात. काही असे खेळाडू असतात, जे काही कारणास्तव हा खेळ खेळू शकत नाही. मात्र असेही काही खेळाडू आहेत जे दुखापतग्रस्त असले तरी त्याच उत्साहाने मैदानात येत असतात.

दरम्यान एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

viral cricket video
Ind vs Aus: सूर्यकुमार यादव ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला का आला? भविष्यात तो वनडे खेळणार का? रोहितने केला खुलासा..

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गोलंदाज एकाच पायाने गोलंदाजी करताना दिसून येत आहे. तो रनअप घेण्यासाठी लाठीचा वापर करतोय. (Latest sports updates)

त्याच लाठीचा वापर करून तो धाव घेतोय आणि चेंडू अचूक टप्प्यावर टाकतोय. हे पाहून भल्या भल्या गोलंदाजाची मान खाली झुकेल.

हा व्हिडिओ एका लोकल क्रिकेट स्पर्धेतील आहे. सुरुवातीला तुम्ही या गोलंदाजाला पाहिलं तर हा गोलंदाज गोलंदाजी करू शकेल असं तुम्हाला वाटणारच नाही.

या व्हिडिओमध्ये तो चेंडू टाकतो आणि चेंडू फलंदाजाच्या पॅडला जाऊन धडकतो. तो अंपायरकडे अपील करतो. मात्र अंपायर नाबाद घोषित करतात.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com