IPL मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात CBIने केली तिघांना अटक; मोठ्या रॅकेटचा संशय

मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
IPL मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात CBIने केली तिघांना अटक; मोठ्या रॅकेटचा संशय
IPL 2022Twitter/ @IPL

इंडियन प्रीमियर लीगमध्ये कथित मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने ३ जणांना अटक केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सीबीआय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इंडियन प्रिमीयर टी-२० लीगमध्ये मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये मोठ्या रॅकेटचा सहभाग असल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या रॅकेटने आयपीएल सामन्यांच्या निकालावर प्रभाव टाकला होता. सध्या सीबीआयने अटक केलेल्या तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना चालू हंगामातील नसून 2019 ची म्हणजे 3 वर्षांपूर्वीची आहे. या प्रकरणी मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजां संदर्भात सीबीआयने नोंदवलेला एफआयआर 2019 च्या हंगामाशी संबंधित असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, फिक्सिंगची व्याप्ती किती मोठी होती किंवा त्यात कोणाचा हात होता, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. 2019 मध्ये ही स्पर्धा भारतातच आयोजित करण्यात आली होती आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रसिद्ध T20 क्रिकेट लीग असल्याने, IPL नेहमीच बुकी आणि फिक्सर्सच्या नजरेत असते. काही वर्षांपूर्वीही लीगमध्ये बेटिंग आणि फिक्सिंगची प्रकरणे समोर आली होती. 2013 मध्ये, राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज एस श्रीशांत, अशोक चंडिला आणि अंकित चव्हाण यांना स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात पकडले गेले आणि त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली, त्यानंतर या तिघांवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. मात्र, प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर तिघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सट्टेबाजीची प्रकरणे देखील समोर आली आहेत. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जला एक हंगाम बाहरे राहावे लागले होते. राजस्थानचे सह-मालक राज कुंद्रा आणि सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन यांचे जावई आणि सीएसके संघाचे गुरुनाथ मयप्पन यांना त्यांच्याच संघांवर बेटिंग केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. यासाठी बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणानंतरच सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयमध्ये सुधारणा करण्यासाठी माजी न्यायमूर्ती आरएम लोढा यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली होती.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.