Guidelines For Betting Apps: ड्रीम इलेव्हन युजर्ससाठी वाईट बातमी! केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगबाबत जारी केल्या सूचना

Government guidelines for betting apps: ऑनलाईन गेमिंगमधील बेकायदेशीर सट्टेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे
Rajiv Chandrashekhar
Rajiv ChandrashekharSaam Tv

Govenrment Guidelines For Fantasy Games: सध्या भारतात ऑनलाईन गेमिंगमध्ये जोरदार सट्टेबाजी सुरु आहे. आता ऑनलाईन गेमिंगमधील बेकायदेशीर सट्टेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व माध्यमांना बेटिंग संबंधित जाहिराती न दाखवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केंद्रीय आयटी आणि दळणवळण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत अधिक माहिती दिली.

Rajiv Chandrashekhar
IPL 2023 KKR VS RCB: हार्दिक पंड्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपणार? मुंबईकर खेळाडूने उडवली झोप..

राजीव चंद्रशेखर म्हणाले की, 'आजपासून ऑनलाईन सट्टेबाजी बंद करण्यात आली आहे. ऑनलाइन खेळात बेटिंग करणे आता बेकायदेशीर मानले जाईल. ते म्हणाले की, जे ऑनलाइन गेम जुगार किंवा सट्टेबाजीला प्रोत्साहन देत आहेत, किंवा त्यावरून वापरकर्त्यांचे नुकसान होणार असेल आणि ज्यामुळे व्यसनाधीनता वाढत असेल, यापैकी एकही घटक आढळून आला तर ते ऍप भारतात उपलब्ध होणार नाही.' (Latest sports updates)

Rajiv Chandrashekhar
IPL 2023 Orange Cap List: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत भारतीय फलंदाजांचा दबदबा; ऋतुराज अव्वल स्थानी तर हे आहेत टॉप 5 फलंदाज

तसेच त्यांनी पुढे म्हटले की,' नियमात अशी तरतूद करण्यात आली आहे की गेममध्ये ऑनलाइन सट्टेबाजी किंवा सट्टेबाजीची कोणताही घटक उपलब्ध असेल, तर तो गेम इंडियामध्ये उपलब्ध नसेल. त्याला परवानगी दिली जाणार नाही.' याबाबत आम्ही संबंधितांशी चर्चा करूनच आयटी नियमांमध्ये सुधारणा केल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं.

जर ऑनलाईन सट्टेबाजी बंद झाली तर ड्रीम इलेव्हेन, माय सर्कल इलेव्हेन, जंगली रम्मी सारखे बेटिंग ऍप्स देखील बंद होतील. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com