IPL Final Winner: जडेजाचा अंतिम चेंडूवर चौकार अन् CSK ने पाचव्यांदा कोरलं जेतेपदावर नाव

IPL Final Match 2023 Live Updates: पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हा सामना आज पार पडणार आहे.
csk
csksaam tv

CSK vs GT,IPL 2023 Final LIVE: ज्या क्षणाची कोट्यवधी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि ४ वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज संघ आमने सामने आले होते. शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने चाैकार मारला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.

csk
Top 5 Moments Of IPL 2023: रिंकूचे ५ षटकार ते गावसकरांनी धोनीचा घेतलेला ऑटोग्राफ; हे आहेत IPL स्पर्धेतील टॉप मुमेंट्स

जडेजाचा अंतिम चेंडूवर चौकार अन् CSK ने पाचव्यांदा कोरलं जेतेपदावर नाव

शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने चौकार मारून चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवून दिला आहे.

२ चेंडू २ धक्के! मोहित शर्माने करून दिलं कमबॅक

मोहित शर्माने अंबाती रायडू आणि एमएस धोनीला बाद करत माघारी धाडलं आहे.

चेन्नईला तिसरा धक्का

अजिंक्य रहाणे २७ धावा करत माघारी परतला आहे.

नूर अहमदने दिला दुहेरी धक्का! CSK ची सलामी जोडी तंबूत

ऋतुराज गायकवाडला २६ धावांवर बाद केल्यानंतर डेवोन कॉनव्हे ४७ धावांवर माघारी परतला आहे.

csk
IPL Final 2023: गर्जा महाराष्ट्र माझा! 'या' मराठमोळ्या खेळाडूंनी बनवलं 'चेन्नई'ला चॅम्पियन

चेन्नईला पहिला धक्का

ऋतुराज गायकवाड २६ धावा करत माघारी परतला आहे.

मैं नहीं तो 'कॉनव्हे', चेन्नईची जोरदार सुरुवात

चेन्नई सुपर किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५ षटकांमध्ये १७१ धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने ४ षटकात बिनबाद ५२ धावा केल्या आहेत.

अखेर १५ षटकांचा होणार सामना

सामना १२:१० वाजता सुरू होणार असून सामन्याची षटके १५ करण्यात आली आहेत. चेन्नईला १५ षटकात १७१ धावांचे आव्हान असणार आहे.

csk
IPL 2023 Prize Money: विजेत्या, उपविजेत्या संघासह खेळाडूंवरही झाला पैशांचा वर्षाव, जाणून घ्या बक्षिसांची रक्कम

षटके कमी झाल्यास कसे असेल CSK च्या विजयाचं समीकरण?

जर षटके कमी केली गेली तर डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला किती टार्गेट मिळणार?

५ षटकात ६६ धावा

१० षटकात १२३ धावा

१५ षटकात १७१ धावा

जर चेन्नईने ५ षटकांचा सामना खेळल्यानंतर पाऊस पडला तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवण्यासाठी पुढील प्रमाणे धावा करणं गरजेचं असणार आहे.

० गडी बाद ४३ धावा

१ गडी बाद ४९ धावा

२ गडी बाद ५६ धावा

३ गडी बाद ६५ धावा

४ गडी बाद ७७ धावा

५ गडी बाद ९४ धावा

csk
IPL Final Winner: जडेजाचा अंतिम चेंडूवर चौकार अन् CSK ने पाचव्यांदा कोरलं जेतेपदावर नाव

पाऊस थांबला मग सामना सुरु व्हायला उशीर का? मोठं कारण आलं समोर

अहमदाबादमध्ये पाऊस थांबला आहे. मात्र सामना सुरु व्हायला आणखी वेळ लागणार आहे. १०:४५ ला अंपायरने खेळपट्टीची पाहणी केली. मात्र खेळपट्टीच्या बाजूला असलेली प्रॅक्टिस पिच अजूनही ओली आहे. त्यामुळे पुढील पाहणी ११:३० वाजता होणार आहे.

क्रिकेट चाहत्यांना दिलासा! पाऊस थांबला; लवकरच सामन्याला होणार सुरुवात

पाऊस थांबला असून १०:४५ वाजता खेळपट्टीची पाहणी केली जाणार आहे.

पावसाने थांबवला खेळ

दुसऱ्या डावात अवघ्या ३ चेंडूचा खेळ होताच, सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे.

अभ्यास केला गिलचा,पेपर आला साईचा! चेन्नईला विजयासाठी मोठं आव्हान

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना वृद्धिमान साहा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात करून दिली होती.

दोघांनी मिळून ६७ धावांची भागीदारी केली. शुभमन गिल ३९ धावा करत माघारी परतला. तर वृद्धिमान साहाने जबाबदारी स्वीकारत ५४ धावांची खेळी केली. तर साहा बाद झाल्यानंतर साई सुदर्शने चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली.

त्याने या डावात ९६ धावांची खेळी केली. गुजरात टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २१४ धावा केल्या आहेत. तर चेन्नईला जेतेपद मिळवण्यासाठी २१५ धावांची गरज आहे.

साई सुदर्शनचा जलवा कायम!

वृद्धिमान साहा बाद झाल्यानंतर साई सुदर्शनने तुफान फटकेबाजी सुरु ठेवली आहे. त्याने ३३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.

साहाची विकेट पडली

वृद्धिमान साहा ५४ धावा करत माघारी परतला आहे. दीप दीपक चाहरच्या गोलंदाजीवर तो झेल बाद झाला आहे.

वाऱ्यापेक्षाही वेगवान स्टंपिंग अन् गिल बाद..

रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर शुभमन गिल यष्टिचित होऊन माघारी परतला आहे. एमएस धोनीने वाऱ्याच्या वेगाने स्टंपिंग करत त्याला माघारी धाडलं आहे.

गिलची विकेट! साहा लढवतोय किल्ला ठोकलं अर्धशतक

गिल बाद झाल्यानंतर वृद्धिमान साहाने कुठलाही दबाव येऊ दिला नाहीये. १२ षटकानंतर गुजराने ११० धावा केल्या आहेत. तर वृद्धिमान साहाने ३७ चेंडूंमध्ये आपले अर्धशत. क पूर्ण केले आहे

पावरप्लेमध्ये साहा- गिल शो

पावरप्लेच्या षटकांमध्ये गुजरातने जोरदार सुरूवात केली आहे. गुजरातची धावसंख्या बिनबाद ६२ वर जाऊन पोहोचली आहे.

साहा- गिलची जोरदार सुरुवात

संथ सुरुवात केल्यानंतर साहा आणि गिलने आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. ४ षटक अखेर गुजरातने ३८ धावा केल्या आहेत.

शुभमन गिलचा झेल सुटला! महागात पडणार?

शुभमन गिल ३ धावांवर फलंदाजी करत असताना, तुषार देशपांडे गोलंदाजी करत होता. या षटकात दीपक चाहरने शुभमन गिलचा सोपा झेल सोडला आहे.

अंतिम सामन्यात चेन्नईचं नाणं खणखणलं! नाणेफेक जिंकत गुजरातला फलंदाजीचं आमंत्रण

अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजरातचा संघ फलंदाजी करताना दिसून येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कुठलाही बदल केला नाहीये.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग

चेन्नई सुपर किंग्ज:

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महिश थिक्षणा

गुजरात टायटन्स:

वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

राष्ट्रगीताने सामन्याची सुरुवात

हा सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com