CSK vs GT Live Score, IPL 2023 Final: पावसानं निकाल लावलाच! चेन्नई-गुजरात फायनलबाबत आली मोठी आणि महत्वाची अपडेट

IPL Final Match 2023 Live Updates: फायनलबाबत आली मोठी आणि महत्वाची अपडेट
CSK vs GT IPL Final 2023
CSK vs GT IPL Final 2023Saam tv

CSK vs GT,IPL 2023 Final LIVE: ज्या क्षणाची कोट्यवधी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे.

या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि ४ वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज संघ मैदानात उतरला आहे. मुख्य बाब म्हणजे हा सामना एमएस धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील अखेरचा सामना असू शकतो. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. हा सामना उद्या खेळवला जाणार आहे.

पावसानं निकाल लावलाच!, चेन्नई-गुजरात फायनलबाबत आली मोठी आणि महत्वाची अपडेट

पावसामुळे आजचा सामना रद्द करण्यात आला आहे. हा सामना उद्या खेळवण्यात येणार आहे. उद्या होणारा सामना हा पूर्ण २० षटकांचा असणार आहे. मैदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मैदान तयार करण्यासाठी किमान एक तास लागेल. त्यामुळे हा सामना उद्या खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत.

CSK vs GT IPL Final 2023
CSK vs GT,IPL Final 2023: ..तर तिकीट असूनही मिळणार नाही फायनल सामन्यात एन्ट्री

सामना केव्हा सुरू होणार? अंपायर म्हणाले..

सामना केव्हा सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत असताना, अंपायरने मोठी माहिती दिली आहे. जर पाऊस ११ वाजता थांबला तर प्रत्येकी ५-५ षटकांचा सामना खेळवला जाईल.

CSK vs GT IPL Final 2023
CSK vs GT, IPL Final 2023: ठरलं तर! गुजरातच जिंकणार फायनल, सामन्यापूर्वीच हार्दिकने वाढवलं धोनीचं टेन्शन

पावसामुळे सामना होणार रद्द?

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना ७:३० वाजता सुरू होणार होता. मात्र अहमदाबादमध्ये पाऊस सुरू असल्यामुळे हा सामना सुरू होऊ शकला नाहीये.

पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण होणार विजेता?

१) सामना सुरू झाला आणि पाहिली इनिंग झाल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये पाऊस पडला तर डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल लावला जाईल.

२) जर एकही चेंडू फेकला गेला नाहीये आणि सामना अजूनही सुरू व्हायचा आहे. असे झाल्यास १२.५० वाजेपर्यंत सुपर ओव्हरचा सामना खेळवला जाईल. असे झाल्यास सुपर ओव्हरच्या साहाय्याने विजेत्या संघाची निवड केली जाईल. (CSK VS GT Weather Report)

३) पाऊस थांबला आणि वेळ शिल्लक असेल तर कमीत कमी ५ ओव्हर्साचा सामना खेळवला जाईल.

४) जर हा सामना आज नाही झाला तर उद्याचा दिवस हा रिझर्व डे असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com