Cheteshwar Pujara :१०० व्या कसोटीनंतर निवृत्त होणार ? चेतेश्वर पुजारा स्पष्टच बोलला

भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. तर दुसरा सामना हा भारतीय संघातील फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे
Cheteshwar Pujara
Cheteshwar PujaraSaam Tv

IND vs AUS Cheteshwar Pujara:भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामन्याला १७ फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

तर दुसरा सामना हा भारतीय संघातील फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण तो आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यादरम्यान निवृत्त होण्याबाबत त्याने मोठे वक्तव्य केले आहे. (Latest Sports Updates)

चेतेश्वर पुजारा निवृत्त होणार?

भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आपला १०० वा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच ३५ वर्षीय चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत त्याने आता प्रतिक्रिया दिली आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलताना त्याने म्हटले की, 'मी टार्गेट सेट करत नाहीये. मला वर्तमानात जगायचं आहे. मी अजून किती वेळ खेळणार याचा विचार न करता एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोय.'

Cheteshwar Pujara
Cheteshwar Pujara Bday: घरी गरिबी, आईने कर्ज काढून दिली होती बॅट, असा घडला Team India चा नवा 'द वॉल'

तसेच तो पुढे म्हणाला की,'माझ्यासाठी खेळण्याचा आनंद घेणं अतिशय महत्वाचं आहे. खेळात पुढे राहणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुमच्याकडून अपेक्षेप्रमाणे खेळ होत नाही त्यावेळी तुम्ही टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार करता मी आता ३५ वर्षांचा आहे आणि माझ्याकडे खूप वेळ शिल्लक आहे.'

पूजाराने आतापर्यंत ९९ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्वि केले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारा दुसरा कसोटी सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना ठरेल. भारतीय संघासाठी १०० कसोटी सामने पूर्ण करणारा तो १३ वा भारतीय फलंदाज ठरणार आहे.

Cheteshwar Pujara
IND vs AUS : दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज; ऑस्ट्रेलियाचं टेन्शन आणखीच वाढणार!

२०१० मध्ये केले होते पदार्पण..

चेतेश्वर पुजाराने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्व झालेल्या कसोटी मालिकेतून पदापर्ण केले होते. वर्तमान भारतीय कसोटी संघातील तो सर्वात अनुभवी फलंदाज आहे. अनेकदा भारतीय संघ अडचणीत असताना त्याने महत्वाची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याचा १०० वा कसोटी सामना आणखी खास करण्यासाठी त्याचे कुटुंब देखील सामना पाहण्यासाठी हजेरी लावणार आहे.

तसेच चेतेश्वर पुजाराच्या कारकिर्दीबद्द्ल बोलायचं झालं तर, त्याने ९९ कसोटी सामन्यांमध्ये ४४.१ च्या सरासरीने ७०२१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १९ शतके आणि ३४ अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद २०६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com