जडेजाला संघातून काढले? चेन्नईने Instagram वरुन केले अनफॉलो, CSK ने दिले उत्तर

जेडजाला दुखापत झाल्यामुळे संघातून बाहेर काढल्याचे सांगितले आहे. परंतु सोशियल मीडियावर वेगळ्याच चर्चा होते आहेत.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaSaam TV

चेन्नईच्या संघाने आधी रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) कर्णधार बनवले. 8 सामन्यानंतर चांगली कामगिरी न केल्यामुळे पुन्हा कर्णधार पदाची माळ धोनीच्या गळ्यात पडली. रवींद्र जडेजासाठी यंदाच्या आयपीएलचा (IPL 2022) हंगाम एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता. रविंद्र जडेजा यंदाच्या हंगामापुर्वी जबरदस्त फॉर्ममध्ये होता. पण चेन्नईने त्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आणि जडेजाचा फॉर्मही गेला अन् कर्णधारपदही. आता रवींद्र जडेजा आयपीएल 2022 मधून बाहेर पडला आहे, ज्याचे कारण तो दुखापतग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे.

रवींद्र जडेजाच्या बरगडीला दुखापत झाली आहे. मात्र, जडेजाच्या संघातून बाहेर पडण्यापूर्वी जे घडले ते खूपच मनोरंजक आहे. जडेजा आणि सीएसकेमध्ये सर्व काही ठीक नाही अशा अफवा सोशल मीडियावर आहेत. टीमचे सीईओ काशी विश्वनाथन यांनीही या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Chennai Super Kings
Chennai Super KingsSaam TV

रवींद्र जडेजाला टीमने इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे सांगितले जात आहे. रवींद्र जडेजाला या हंगामात बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा आरोप चाहत्यांनी केला आहे. चेन्नई सुपर किंग्जचे इंस्टाग्राम अकाउंट जडेजाला फॉलो करत होते पण आता तो त्याच्या फॉलोअर्स लिस्टमध्ये दिसत नाही. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

चेन्नईचे सीईओ काय म्हणाले?

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी जडेजाबाबत पसरलेल्या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये विश्वनाथन म्हणाले की सोशल मीडियावर सुरू असलेल्या गोष्टी मला माहित नाहीत, परंतु जडेजा भविष्यातील योजनांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा देखील एक भाग असणार आहे. जडेजा ज्या प्रकारे कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे आणि त्यानंतर त्याला चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे, ते पाहता या विधानावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे.

सुरेश रैनाच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्जने त्याला विकत घेतले नाही. ज्यानंतर CSK सीईओ म्हणाले होते की त्याच्या खराब फॉर्ममुळे संघाने त्याला खरेदी केले नाही. जडेजाच्या बाबतीतही तेच घडतंय का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

यंदाचे IPL जडेजासाठी ठरले खराब!

रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्सने 16 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते पण तो या मोसमात फ्लॉप ठरला. जडेजाला 10 सामन्यांत 19.33 च्या सरासरीने केवळ 116 धावा करता आल्या. तसेच त्याला केवळ 5 विकेट घेता आल्या. क्षेत्ररक्षणातही जडेजाने अनेक झेल सोडले. अशा परिस्थितीत जडेजाचाही आता चेन्नई सुपर किंग्जसाठी काही उपयोग नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com