
बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (common wealth games 2022) चौथ्या दिवशी भारतीय (india) खेळाडूंनी उज्जवल कामगिरी करीत आणखी तीन पदकं (medal) प्राप्त केली. भारतीय क्रीडाप्रेमी याचा आनंद लुटत असतानाच एक वाईट बातमी कानावर पडली. देशाच्या सायकलिंग (cycling) संघात समावेश असलेल्या मीनाक्षी (Indian cyclist Meenakshi) बाबतची. स्पर्धेदरम्यान मीनाक्षीचा अपघात (accident) झाला आणि क्रीडाप्रेमींचा (sports) काळजाचा ठाेकाच चुकला. या अपघातानंतर तिला मैदानातून स्ट्रेचरवरुन बाहेर काढलं. (Indian cyclist Meenakshi Latest Marathi News)
भारतीय सायकलपटू मीनाक्षी ट्रकवरुन घसरली
महिलांच्या दहा किलाे मीटरच्या सायकलिंगमधील स्केच रन प्रकारात भारतीय सायकलपटू मीनाक्षी वळण घेण्याच्या प्रयत्नात असतानाच तिची सायकल अडकल्याने ती जखमी झाली आणि खाली पडली. यादरम्यान तिच्या पाठीमागूण येणा-या न्यूझीलंडच्या प्रतिस्पर्ध्याची सायकल मीनाक्षीच्या अंगावरुन गेली आणि न्यूझीलंडची खेळाडू देखील पडली.
या अपघातात सायकलवरून पडल्यानंतर मीनाक्षी घसरली आणि ट्रॅकच्या काठावर पोहोचली आणि न्यूझीलंडच्या ब्रायोनी बोथालाही मार लागला. बोथाची सायकल मीनाक्षीच्या अंगावर आली आणि तीही सायकलवरून पडली.
हा अपघात झाल्यानं दोन्ही खेळाडूंना सामन्यातून बाहेर काढण्यात आलं हाेते. या अपघातानंतर लगेचच तेथे उपस्थित असलेले वैद्यकीय अधिका-यांनी मीनाक्षीच्या दिशेने धाव घेतली. वैद्यकीय अधिका-यांनी मीनाक्षीला तेथून स्ट्रेचरवर नेले. या स्पर्धेत अपघाताच्या वेळी आघाडीवर असलेल्या इंग्लंडच्या लॉरा केनीचाही समावेश होता. या स्पर्धेत केनीने सुवर्णपदक जिंकले.
मीनाक्षीच्या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथील ली व्हॅली वेलो पार्कमध्ये दोन दिवसांतील हा दुसरा अपघात आहे. याआधी इंग्लंडचा मॅट वॉल्सही या स्पर्धेदरम्यान सायकलवरून खाली पडला होता. मीनाक्षी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देशभरातील क्रीडाप्रेमी प्रार्थना करीत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.