राष्ट्रकुल स्पर्धेआधीच नवा वाद! 'माझ्या प्रशिक्षकांना थेट घरी पाठवले' बॉक्सर लव्हलिनाचा गंभीर आरोप

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ सुरू होण्याआधी एक मोठा वाद समोर आला आहे.भारताला ऑलम्पिक पदक जिंकून देणारी बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनला मानसिक छळ सहन करावा लागत आहे.
Boxer Lovlina Borgohain News
Boxer Lovlina Borgohain Newssaam tv

मुंबई : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games) सुरू होण्याआधी एक मोठा वाद समोर आला आहे.भारताला ऑलम्पिक पदक जिंकून देणारी बॉक्सर (Boxer) लव्हलिना बोरगोहेनला मानसिक छळ सहन करावा लागत आहे. सध्या लव्हलिना ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ब्रिटनमध्ये दाखल झाली आहे. पण तिच्या एका प्रशिक्षकांनाच आता थेट घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे तिला स्पर्धेसाठी सराव कसा करायचा असा प्रश्न तिच्यापुढे आहे. (Boxer Lovlina Borgohain News)

Boxer Lovlina Borgohain News
Axar Patel : अक्षर पटेलची धमाकेदार इनिंग; महेंद्रसिंग धोनीचा १७ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला (व्हिडिओ बघा)

लव्हलिनाने ट्विट करत लिहिले आहे की, आज मी दु:ख व्यक्त करीत लिहित आहे की, मला खूप छळ सहन करावा लागत आहे. प्रत्येक वेळी ज्या प्रशिक्षकांनी मला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यास मदत केली, त्यांना माझ्या प्रशिक्षण प्रक्रियेतून आणि स्पर्धेतून काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक संध्या गुरुंग यांचा देखील सामावेश आहे. हजारो विनंत्या करूनही, त्यांना नेहमी माझ्या प्रशिक्षणासाठी उशिरा पाठवले जाते. मला या प्रशिक्षणासाठी फार अडचणींचा सामना करावा लागत आहे. मला खूप मानसिक छळ सहन करावा लागत आहे'.

Boxer Lovlina Borgohain News
IND vs WI : धोनीसारखाच षटकार ठोकत अक्षरनं सामना जिंकवला; भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय

लव्हलिना पुढे म्हणाली, 'आता माझ्या प्रशिक्षक संध्या गुरुंग या 'कॉमनवेल्थ व्हिलेज'च्या बाहेर आहेत. त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. माझे प्रशिक्षण हे खेळाच्या आठ दिवसाआधीच थांबलं आहे . माझ्या दुसऱ्या प्रशिक्षकांना पुन्हा भारतात पाठवण्यात आलं आहे. यामुळे माझा खूप मानसिक छळ होत आहे. मला आता काहीच कळत नाही की, आता खेळावर लक्ष केंद्रित कसं करू ?'. या साऱ्या प्रकारमुळे माझ्या मागच्या विश्व चॅम्पियनशिपमध्येही माझी कामगिरी खराब झाली. या राजकारणामुळे माझी आगामी राष्ट्रकुल स्पर्धा देखील उध्वस्त होऊ शकते. मी आशा व्यक्त करते की, मी या राजकारणावर मात करून देशासाठी पदक आणेन. जय हिंद'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com