IND vs WI: 'त्या' पॉझिटिव्ह खेळाडूंच्या जागेवर दुसरे खेळाडू संघात येणार

पॉझिटिव्ह आलेल्या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. भारताचा संपुर्ण चमू अमहमदाबादल पोहोचल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली होती.
Shikhar Dhawan
Shikhar Dhawan Saam TV

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 6 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. याआधी भारतीय गोटातून एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील (Team India) चार खेळाडू आणि 3 सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. वृत्तानुसार, सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan Corona Positive), ऋतुराज गायकवाड, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि स्टँडबाय खेळाडू नवदीप सैनी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. भारताचा संपुर्ण चमू अमहमदाबादल पोहोचल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली होती. बीसीसीआयचे (BCCI) वैद्यकीय पथक सध्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंच्या जागेवर कोणाला संघात घ्यायचे याची घोषणाही लवकरच बोर्ड करेल. भारताला 6 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) तीन एकदिवसीय सामन्यांपैकी पहिला सामना खेळायचा आहे. 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कोलकातामध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

Shikhar Dhawan
IND vs WI: ऐतिहासीक एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविनाच...

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खबरदारी म्हणून दोन्ही संघातील खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. 4 खेळाडूंची आणि सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेले आहे. या मालिकेबाबत अजून काही निर्णय झालेला नाही. माझ्या खेळाडूंच्या जागेवर दुसरे खेळाडू घेवून मालिका घेवू असे त्यांनी सांगितले आहे.

7 दिवस विलगीकरणात राहतील

BCCI ने घेतलेल्या निर्णयानूसार मंगळवारी सर्व खेळाडूंची आणि स्टापची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेत त्यांना 7 दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

मयंक अग्रवालचा वनडे संघात समावेश

सात सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निवड समितीने मयंक अग्रवालचा भारताच्या एकदिवसीय संघात समावेश केला आहे. RT-PCR चाचणीच्या तीन फेऱ्यांनंतर टीम इंडियाचे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 6 तारखेपासून मालिकेला सुरुवात होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com